AI Generated Brain Man : वैज्ञानिक क्षेत्रात एक ऐतिहासिक संशोधन झाले आहे. हार्वर्ड विद्यापीठ आणि गुगलने संयुक्तपणे मानवाच्या मेंदूचा आतापर्यंतचा सर्वात तपशीलवार नकाशा तयार केला आहे. यामुळे मेंदूच्या कार्यपद्धतीचे गूढ उलगडण्यात मोठी मदत होणार आहे.
या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी २०१४ मध्ये एपिलेप्सीच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णापासून काढलेल्या मेंदूच्या 1 घन मिमी भागावर काम केले. या छोट्याशा भागात सुमारे ५७ हजार पेशी आणि १५० दशलक्ष सिनेप्सिस (न्यूरॉन्सच्या जोडणी) होत्या. या तपशीलवार नकाशा तयार करण्यासाठी संशोधकांनी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ मेहनत घेतली आहे.
यासाठी मेंदूच्या पेशींमधील लिपिड मेम्ब्रेनवर धातूंचा लेप लावण्यात आला. त्यानंतर त्याचे अत्यंत पातळ काप करून इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने त्याचे निरीक्षण करण्यात आले. या प्रक्रियेत १.४ पेटाबाइट्स इतके डेटा जमा झाला. या डेटावरून तीन-आयामी नकाशा तयार करण्यासाठी गुगलच्या सहकार्याने मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला.
या नकाशामुळे मेंदूच्या पेशींच्या रचनेबद्दल खूप माहिती मिळाली आहे. यात असे न्यूरॉन्स आढळले आहेत ज्यांच्यात ५० पेक्षा जास्त सिनेप्सिस आहेत. आतापर्यंत हे लक्षात आले नव्हते. यामुळे मेंदूच्या कार्यपद्धतीचे अधिक चांगले विश्लेषण करता येईल.
या नकाशामुळे मानसिक आजारांचे कारण शोधणे सोपे होऊ शकते आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही क्रांती घडू शकते. पुढच्या टप्प्यात संशोधक संपूर्ण उंदराच्या मेंदूचा आणि मानवाच्या मेंदूच्या इतर भागांचा असाच तपशीलवार नकाशा तयार करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे मेंदूविषयक संशोधनात आणखी पुढील वाटचाल होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.