Solar Eclipse 2024 : आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; या वेळेत आकाशात दिसणार रिंग ऑफ फायर

Surya Grahan 2024 Timing Visibility in India : आज 2024 वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण आहे. या सूर्यग्रहणाला लोकप्रियतेने "रिंग ऑफ फायर" असे म्हणतात.
Surya Grahan 2024 Timing Visibility in India
Surya Grahan 2024 Timing Visibility in Indiaesakal
Updated on

Surya Grahan 2024 : यंदाच्या वर्षातील मोठी खगोलीय घटना आज घडणार आहे. आज सूर्यग्रहण लागणार आहे. नासाने पुष्टी केली आहे की, २ ऑक्टोबर २०२४ रोजी चंद्र सूर्यासमोर येईल आणि पृथ्वीच्या काही भागांवर त्याची सावली पडेल. या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे.

या सूर्यग्रहणाला लोकप्रियतेने "रिंग ऑफ फायर" असे म्हणतात. हे वलयकार सूर्यग्रहण तेव्हा असते जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात दूरच्या बिंदूवर असताना सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान येतो. चंद्र पृथ्वीपेक्षा नेहमीपेक्षा दूर असल्याने तो सूर्यापेक्षा लहान दिसतो आणि सूर्य पूर्णपणे झकळत नाही. यामुळे आकाशात "रिंग ऑफ फायर" सारखे दिसते.

सूर्यग्रहण कधी सुरू होणार?

भारतीय मानक वेळेनुसार ते रात्री ९.१२ वाजता सुरू होईल आणि दुपारी ३.१७ वाजता संपेल.

Surya Grahan 2024 Timing Visibility in India
Free Fire Max Codes : आले रे आले फ्री फायरचे रिडीम कोड आले; हिरे, गन स्किन्स अन् बरंच काही,लगेच मिळवा फ्री रिवॉर्ड्स

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

नाही, ही रिंग ऑफ फायर भारतात दिसणार नाही. नासाने म्हटले आहे की, "दक्षिण अमेरिकेच्या काही भागांमध्ये वलयकार सूर्यग्रहण आणि दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, अटलांटिक महासागर आणि हवाईसह पॅसिफिक महासागराच्या काही भागांमध्ये अंशतः सूर्यग्रहण दिसणार आहे."

अर्जेंटिना आणि चिलीच्या काही भागांमध्ये विशेषतः वलयकार सूर्यग्रहण दिसणार आहे. अमेरिकन सामोआ, अंटार्क्टिका, अर्जेंटिना, बेकर आयलंड, युनायटेड स्टेट्स मायनर आउटलाईंग आयलंड्स, ब्राझील, चिली, ख्रिसमस आयलंड, क्लिपरटन आयलंड, कुक आयलंड्स, फॉकलंड आयलंड्स, फिजी, फ्रेंच पॉलिनेशिया, हवाई यूएसए, मेक्सिको, न्यूझीलंड, निउ, पॅलमायरा ऍटॉल यूएस मायनर आउटलाईंग आयलंड्स, पॅराग्वे, पिटकेर्न आयलंड्स, समोआ, दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण सँडविच आयलंड्स, टोकेलौ, टोंगा, तुवालू, उरुग्वे, वालिस आणि फुटुना या सर्व किंवा काही भागांमध्ये अंशतः सूर्यग्रहण दिसणार आहे.

Surya Grahan 2024 Timing Visibility in India
Google For India 2024 : दिवाळीआधी भारतासाठी गुगलकडून AIची अनोखी भेट; वार्षिक कार्यक्रमात मोठ्या घोषणांसह काय खास असणार? पाहा

सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली लढाऊ विमानाच्या गतीपेक्षा वेगवान होईल, असे नासाने सांगितले आहे. तुम्ही असलेल्या ठिकाणाच्या आधारे चंद्राची सावली खूप वेगवेगळ्या गतीने जाणारी दिसते. काही ठिकाणी ते ताशी 6 दशलक्ष मैल (ताशी 10 दशलक्ष किलोमीटर) पेक्षा वेगवान जाईल; तर काही ठिकाणी ते ताशी 1,278 म मैल (ताशी 2,057 किलोमीटर) किंवा लढाऊ विमानाच्या गतीने इतक्या हळूवार जाईल.

सूर्यग्रहण तुमच्या भागात दिसत नसले तरी सूर्य बघणे सुरक्षित आहे का?

सूर्यग्रहण तुमच्या भागात दिसत नसले तरी सूर्यकडे पाहण्याचा प्रयत्न करताना सावध रहा. पूर्ण किंवा अंशतः सूर्यग्रहण असताना सूर्याच्या किरणांचे थेट निरीक्षण डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.