Navratri 2024 : एक-दोन नव्हे तर पुण्यात आहेत देवीची इतकी मंदिरे, तुम्हाला माहितीयेत का?

Devi Temple In Pune : नवरात्रोत्सवाच्या काळात या मंदिरांमध्ये गर्दी होते. पुण्यातील या मंदिरात इतर जिल्ह्यातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
Devi Temple In Pune
Devi Temple In Pune esakal
Updated on

Devi Durga Temple In Pune :

पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर मानले जाते. कारण, पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आणि विविधतेने नटलेले शहर आहे. पुण्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. पुण्यात काही प्राचिन मंदिरेही आहेत. तसेच, पुण्यात देवीचीही मंदिरे आहेत. पण, काही ठराविक मंदिरे सोडली तर देवीच्या या मंदिरांबद्दल फारशी माहिती नाही.

पुण्यात देवी चतु:श्रृगी, माता वैष्णोदेवीचेही मंदिर आहे. तसेच, इतरही देवीची मंदिरे आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात या मंदिरांमध्ये गर्दी होते. पुण्यातील या मंदिरात इतर जिल्ह्यातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. (Devi Temples In Pune)

Devi Temple In Pune
#TrafficUpdates : पुणेकरांनो...'या' रस्त्यावर आहे सध्या वाहतूक कोंडी 

तांबडी जोगश्वरी मंदिर

तांबडी देवीच्या तांबडी जोगेश्वरीचे मंदिर पुण्यातील आप्पा बळवंत चौक येथे हे मंदिर आहे. नवरात्री या मंदिरामध्ये देवीचे वेगवेगळे रूपे पाहायला मिळतात. हे मंदिर पेशवेकालीन आहे. या देवीने तांबडी राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला हे नाव पडले अशी आख्यायिका सांगितली जाते.

तांबडी जोगेश्वरी मंदिर पुणे
तांबडी जोगेश्वरी मंदिर पुणेतांबडी जोगेश्वरी मंदिर

वैष्णो देवी मंदिर पुणे

जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती असलेले देवीचे मंदिर पुण्यातही आहे. पुण्यात पिंपरी येथे हे वैष्णोदेवीचे मंदिर आहे. हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरांपैकी एक आहे. जम्मूच्या वैष्णो देवी मंदिरासारखीच शांतता इथे अनुभवायला मिळते.  खास गोष्ट म्हणजे या मंदिरात गुफाही आहे. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केल्यांनंतर गाभाऱ्याकडे जाण्यासाठी एक गुफा बनवली गेली आहे.  

रोज सकाळी 6.30 वाजता आणि संध्याकाळी 7.30 वाजता त्यांची आरती होते. तर, जर तुम्ही या मंदिराला भेट दिली नसेल, तर या नवरात्रीला भेट द्या. (Navratri 2024)

वैष्णो देवी मंदिर पुणे
वैष्णो देवी मंदिर पुणेesakal
Devi Temple In Pune
Navratri 2023 : 'ती' उभीये सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय! सर्व बंधनं झुगारत पुरुषाच्या बरोबरीनं दाखवतेय महाराष्ट्राला आपलं सामर्थ्य

 आई माता मंदिर पुणे

पुण्यातील कोंढव्यात वसलेले हे सुंदर मंदिर एका टेकडीवर वसलेले असून ते पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी बनलेले आहे. बारीक नक्षीकाम, भव्य कमान, प्रवेशद्वार आणि संगमरवरी हत्तींमुळे हे मंदिर अतिशय आकर्षक वाटते. मंदिरात प्रवेश करताच तुम्ही पायऱ्या चढून वर जाल जे तुम्हाला देवीच्या मुख्य मंदिराचे दर्शन होते.

पुण्यातील इंद्रायणी रणदिवे रोड कोंढवा येथे असलेले हे  देवीचे अतिशय सुंदर अशी संगमरवर मूर्ती आहे. मंदिरात झुंबर असलेले सुंदर कोरीव काम आहे. नवरात्रीच्या वेळी मंदिर दिव्यांनी उजळलेले असते.

आई माताजी मंदिर
आई माताजी मंदिर esakal
Devi Temple In Pune
Navratri Recipe: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बनवा कुरकुरीत उपवासाचे रोल, नोट करा रेसिपी

भवानी माता मंदिर

पुण्यातील नवीन भवानी पेठ परिसरात असलेले, हे मंदिर 1763 मध्ये बांधले गेले होते. ज्यामुळे ते शहरातील सर्वात जुन्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक  आहे. भवानी माता मंदिर हे एक शक्तिशाली मंदिर असल्याचे स्थानिक लोक म्हणतात.

इथे तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान वेगळीच भक्तीची अन् दिव्य तेजाची अनुभूती घेऊ शकता. या मंदिरात महापूजा केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते,अशी मान्यता आहे. भवानी माता मंदिरातील देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मंगळवार आणि शुक्रवारी मंदिरात गर्दी अधिक असते. 

Devi Temple In Pune
Navratri 2024: आदिमायेस रोज नवरंगाचा आहेर, म्हसदीतील धनदाईदेवीचे मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले!
भवानी माता मंदिर
भवानी माता मंदिरesakal

चतु:श्रुंगी माता मंदिर

सेनापती बापट रोडवर वसलेले, चतुश्रृंगी मंदिर हे शहरातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. देवीचे हे मंदिर सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे. हे सप्तश्रृंगी मातेचे  मंदिर निस्सिम भक्त दुर्लभशेठ पितांबरदास महाजन यांनी मराठा राजवटीत बांधले होते . चतुश्रृंगी मंदिर 90 फूट (27 मीटर) उंच आणि 125 फूट (38 मीटर) रुंद असून ते शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते.

देवी अंबरेश्वरी (सप्तशृंगी देवी) मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.  पुणे विद्यापीठ रोड जवळ, गोखलेनगर जवळ असलेल्या या मंदिरात असलेली देवी पुणे शहराची राखण करणारी ती देवता मानली जाते. लाल रंगाच्या भव्य विटांच्या मंदिरात 170 पायऱ्या आहेत.  मंदिर हिरवाईने नटलेले आहे. मंदिराजवळ एक सुंदर बागिचा आहे. हे मंदिर खरंच तुमच्या मुलांसाठी पिकनिक स्पॉट असू शकते.

चतु:श्रुंगी माता मंदिर
चतु:श्रुंगी माता मंदिर esakal
Devi Temple In Pune
Shardiya Navratri Decoration Idea 2024: अंबाबाईचा उदो उदो..! नवरात्रीत पूजास्थळ सजवण्यासाठी 'या' वस्तूंचा करा वापर, लाभेल सुख-समृद्धी

शितलज माता मंदिर

लक्ष्मी रोडच्या गजबजलेल्या रस्त्यावर वसलेले हे शहरातील एक छोटेसे पण प्रमुख देवस्थान आहे. या मंदिरात देवीची सुंदर उभी मूर्ती संगमरवरी कोरलेली आहे आणि जड साड्यांमध्ये सुशोभित केलेली आहे. नवरात्रीच्या काळात , मंदिर वरपासून खालपर्यंत परी दिव्यांनी चांगले उजळलेले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.