महाराष्ट्रात प्राचिन देवीची अनेक मंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिरांचे वैशिष्ट, त्यांची प्राचिनता, मंदिराशी संबंधित आख्यायिका आहेत. नवरात्रीच्या या उत्सवकाळात आज आपण अशाच काही वेगवेगळ्या मंदिरांची माहिती घेणार आहोत. ज्या मंदिरांची आख्यायिका, कथा, प्राचिनचा आपल्याला थक्क करते.
आज आपण कोकणातील मालवणमधील एका मंदिराबदद्ल जाणून घेणार आहोत. ज्या मंदिराजवळ असलेला तलाव अन् त्या मंदिराची आख्यायिका अचंबित करणारी आहे. कोकणातील धामापूर या गावात असलेला धामापूरचा तलाव जगप्रसिद्ध आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे. पण कोकणात असलेला हा तलाव अन् इथली देवी वेगळी आहे.
या तलावाशेजारी श्री भगवती मातेचे जागृत मंदिर आहे. गावातील ग्रामस्थ व बंधा-याचे रक्षण ही देवीच करते, अशी भावना आहे. मंदिर पुरातन असुन कोरीव कलाकुसर केलेले आहे. हेमाडपंथी शैलीतील मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. १८२७ मध्ये सभामंडपाचे बांधकाम झाले असल्याची नोंद सापडते.
१६ व्या शतकात इ. स. १५३० मध्ये विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी धामापूर गावात एक विस्तीर्ण तलाव बांधला आणि त्या तलावाकाठी श्री भगवती देवीचे सुंदर देवालय उभारले. जवळच बत्तीस पायऱ्यांचा देखणा सुंदर घाट बांधला. १९५२ साली तलावावर कायमस्वरुपी बंधारा बांधला. सुमारे ४७५ वर्षाहूनही अधिक काळाचा इतिहास असलेल्या श्री देवी भगवती देवालयामुळे धामापूर हे गाव इतिहासात नोंदले गेले आहे.
मंदिरामध्ये देवी भगवतीची पाषाणात कोरलेली सुमारे चार फूट उंचीची सुबक मूर्ती आहे. पुराणात महिषासूरमर्दिनीचे जे वर्णन करण्यात आले आहे ते वर्णन तंतोतंत येथील मूर्तीला लागू पडते. देवीच्या एका हातात शंकराची आयुधे आहेत. तर दुस-या हातात शक्तीची आयुधे आहेत. यामुळे मूर्तीमध्ये शिव आणि शक्तीचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो.
मंदिराला लागुनच अंडाकृती रचनेचा अतिशय सुरेख तलाव आहे. पाण्यात उतरण्यासाठी पायर्यांची सोय केलेली आहे.
सोन्याच्या फुलांच्या चमत्काराबाबत असं सांगितलं जातं की, तो काळ असा होता की लेकीची पाठवणी भरगच्च दागिने घालून करावी. पण, प्रत्येकालाच हे शक्य नव्हते. तेव्हा संबंधित व्यक्ती लग्नाच्या आधी फुलांनी बनविलेले दागिने एका परडीत घालून ते तळ्यात सोडत असे. दुसऱ्या दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असायचे. ती व्यक्ती येऊन ते दागिने घेऊन जायची.
यामध्ये अट इतकीच होती की, तुमचं काम झालं की देवीचे दागिने देवीला परत आणून द्यायचे. त्यामुळे लोक लग्न झालं की सगळे दागिने पुन्हा परडीत घालून नदीत सोडायचे.
असं खूप वर्ष असं चाललं. मात्र, एका व्यक्तीला दागिन्याचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले. त्यावेळी भगवती देवीचा कोप होऊन हि प्रथा पुढे बंद झाली. स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये बोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.