पृथ्वीवर कुठलीही देवी म्हणजे साक्षात आई भवानी, अन् जगदंबेचच रूप. आज आम्ही तुम्हाला राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात असल्या एका मंदिराविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये प्रमुख देवतेला प्रसाद म्हणून मद्य अर्पण केले जाते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे पुजाऱ्याकडून हा नैवेद्य दाखवल्यानंतर माताही मद्य सेवन करते.
आज आम्ही तुम्हाला अशा मंदिराबद्दल माहिती सांगणार आहोत ज्या फारशा प्रचलित नाहीत. ज्याची खासियत इतर मंदिरे आणि शक्तीपीठांपेक्षा वेगळी आहे. नागौर जिल्ह्यातील असलेल्या भनवाल माता मंदिराची कहाणी थोडी वेगळी आहे. (Navratri 2024)
सध्या नवरात्रीची धामधूम सुरू आहे. सर्वत्र दुर्गामाता विराजमान झाली आहे. तर, देवीच्या प्राचिन मंदिरांमध्ये भाविकांचा महापूर उसळलेला असतो. भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी लाडू, पेढे, बर्फीसह ५६ पदार्थ अर्पण करतात. पण आपल्या भारतात असं एक मंदिर आहे, जिथे देवीला मद्याचा नैवेद्य दाखवला जातो.
इतर मंदिरांप्रमाणे येथेही देवीला केवळ लाडू, पेढा किंवा बर्फीच नाही तर मद्यही अर्पण केले जाते. तेही अडीच कप. हे थोडं विचित्र आहे पण सत्य आहे. पण प्रत्येक भक्त हा नैवेद्य देऊ शकत नाही. त्यासाठी भाविकांचीही श्रद्धेच्या निकषावर परीक्षा घेतली जाते.
भनवाल मातेला काली मातेचे रूप मानले जाते. या मातेला प्रसाद म्हणून मद्य दिली जाते. या देवीला फक्त अडीच कप मद्य अर्पण केले जाते. या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या मंदिराचा जीर्णोद्धार डाकूंनी केला होता.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की भनवाल देवीसमोर दारूने भरलेला चांदीचा ग्लास ठेवून पुजारी डोळे मिटून प्रसाद स्वीकारण्याची विनंती करतात. थोड्याच वेळात पेल्यातून मद्य गायब होते. हे तीन वेळा केले जाते. तिसऱ्या वेळी कप अर्धा भरलेला राहतो.
स्थानिक मान्यतेनुसार, काही डाकूंनी एक गाव लुटले आणि भंवाल माता मंदिर परिसरात लपले. या दरम्यान राजाचे सैन्य तेथे आले आणि त्यांना पकडण्यास सुरुवात केली, त्यानंतर डाकूंनी मातेची प्रार्थना केली. मग भनवाल मातेने राजाच्या सैन्याला मेंढ्या बनवल्या. त्यानंतर डाकूंनी मातेचे मोठे मंदिर बांधून पूजा सुरू केली.
मंदिरातील प्राचीन शिलालेखानुसार हे मंदिर १२व्या शतकापेक्षा जुने आहे. याशिवाय हे मंदिर लाल दगडांच्या बांधकामातलं आहे. राजस्थानातील प्रसिद्ध शक्तीपीठांमध्ये या मंदिराची गणना होते. मंदिरात ब्राह्मणी आणि काली मातेच्या दोन मूर्ती आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्यात मातेच्या दोन मूर्ती स्थापित आहेत. उजवीकडे ब्राह्मणी माता आहे, जिला गोड प्रसाद दिला जातो. डावीकडील दुसरी मूर्ती काली माता म्हणजे भनवाल माता आहे, जिला मद्य अर्पण केले जाते. लाखो भाविक येथे आपल्या मनोकामना घेऊन येतात. देवी त्यांच्या मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.