Navratri 2024 : या मंदिरात दिवसातून तीन वेळा देवी बदलते रूप, अशी आहे नागपूरची जगदंबा माता

महाराष्ट्रात नागपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर कोराडी या गावी जगदंबा मातेचे मंदिर आहे. हे मंदिर खास आहे ते इथे घडणाऱ्या चमत्कारामुळे अन् लोकांना येणाऱ्या प्रचितीमुळे.
Navratri 2024
Navratri 2024esakal
Updated on

Jagdamba Mata Koradi,Nagpur :

 महाराष्ट्रात देवीची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी साडेतीन शक्तीपिठे ही आपल्याय राज्यात आहेत. पण या काही देवता सोडल्या तर देवीच्या मंदिरांबद्दल फारशी माहिती कोणाला नाही. पण, आपल्या महाराष्ट्रात देवीची अशीही काही मंदिरे आहेत जी प्रसिद्ध नाहीत पण चमत्कारिक अन् तितकीच दिव्य आहेत. आज आपण अशाच एका मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत.

महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीचे हे मंदिर नागपूरच्या उत्तरेस १५ किमी अंतरावर आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. यावरून मंदिराची प्राचीनता दिसून येते. हिंदू जीवनातील धर्म, अर्थ, काम, मोक्ष या स्तंभांचे यश केवळ देवीच्या दर्शनानेच मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Navratri 2024 )

Navratri 2024
Nashik Navratri 2024 : जगदंबेच्या चरणी हजारो भाविक लीन! कोटमगावला रमेशगिरी महाराजांच्या हस्ते घटस्थापना, हजारांवर भाविक बसले घटी

महाराष्ट्रात नागपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर कोराडी या गावी जगदंबा मातेचे मंदिर आहे. हे मंदिर खास आहे ते इथे घडणाऱ्या चमत्कारामुळे अन् लोकांना येणाऱ्या प्रचितीमुळे. माता जगदंबेचा असा भव्य दिव्य मंदिर सुमारे ३०० वर्षे जुने आहे. या मंदिरात असलेली देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे, असे मानले जाते. म्हणजे त्याची स्थापना झाली नसून ही मूर्तीच येथे प्रकट झाली आहे.

 हे मंदिर खास आहे ते इथे घडणाऱ्या चमत्कारामुळे अन् लोकांना येणाऱ्या प्रचितीमुळे.
हे मंदिर खास आहे ते इथे घडणाऱ्या चमत्कारामुळे अन् लोकांना येणाऱ्या प्रचितीमुळे. esakal

 कोराडी येथे माता जगदंबेचे मंदिर हे सुमारे दीडशे एकर परिसरात पसरले आहे. त्याची एक खासियत म्हणजे मातेचा गाभारा चांदीचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने त्याचा पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. चार वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला भव्य स्वरूप देण्यात आले.

राजस्थानातील ढोलपूर येथून आणलेल्या दगडांनी ते पुन्हा बांधण्यात आले आहे. माता जगदंबेचे मंदिर सुरू होताच भव्य महाद्वार दिसते. या देवीच्या चरणावर कमळाचे फूल अर्पण केले जाते. माता जगदंबेला कमळाचे फूल आवडते, म्हणूनच येथे येणारे भाविक ओटीसोबत कमळाचे फूल आणायला विसरत नाहीत.

Navratri 2024
Navratri Fast Recipe: उपवासाला नाश्त्यात बनवा स्वादिष्ट अन् आरोग्यदायी रताळे चाट, लिहून घ्या रेसिपी

आई जगदंबेच्या दरबारात एक दिवा आहे जो २४ तास ३६५ दिवस प्रज्वलित राहतो. महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिर परिसरात शिवाचे मंदिरही आहे. मंदिराच्या आवारात दुकानेही आहेत. कोराडी येथील माँ जगदंबेचा दरबार जितका सुंदर आहे तितकाच मंदिराचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्यात आला आहे.

घडतो हा चमत्कार

विशेष म्हणजे देवीच्या मंदिरात दररोज एक चमत्कार घडतो. तो असा की, दिवसातील तीन प्रहरांमध्ये देवी तिचे रूप बदलते. सकाळी देवी कन्येच्या रूपात दिसते. दुपारी एका तरुणीच्या रूपात तर रात्रीच्यावेळी ती प्रौढ रूपात दिसते. तुम्ही भक्तीभावाने तिला वंदन करून पाहिले तर मातेच्या या रूपांची प्रचिती तुम्हाला येते,असे सांगितले जाते.  

esakal
जगदंबा मातेची मूर्ती
Navratri 2024
Navratri Garba Night: गरब्यात घागरा झालाय कॉमन, ट्रेंडी दिसायचं असेल तर फॉलो कर 'हे' इंडो-वेस्टर्न लुक्स

जगदंबेची पौराणिक कथा काय आहे?

कोराडी हे पूर्वी जाखापूर म्हणून ओळखले जात होते. जाखापूरचा राजा झोलन याला सात पुत्र होते. जानोबा, नानोबा, बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा आणि दत्तसुर ही मुलं राजाला होती. पण कन्यारत्न न मिळाल्याने राजा दुःखी होता. त्यांनी यज्ञ, हवन, पूजा आणि तपश्चर्या करून देवाला प्रसन्न केले आणि कन्यारत्न मागितले.

देवी प्रसन्न झाली अन् देवाला कन्यारत्न झाले. महालक्ष्मी असे तिचे नाव ठेवले. कन्या मिळाल्याने राजा समाधानी होता. तो लेकीचे सर्व लाड पुरवायचा. कन्या हळू-हळू मोठी झाली. एकदा राजा युद्धाला निघाला. तेव्हा, या कन्येनेही मी युद्धावर येईल असे सांगितले. तेव्हा राजाने कन्येसोबत अनेक युद्ध जिंकत शत्रुचा पराभव केला.

जेव्हा राजा आणि कन्या युद्ध करून माघारी परतत होते. तेव्हा, कन्येने राजाला सांगितले की, सुर्यास्तापर्यंतच मी तुझ्यासोबत येईल, जिथे सुर्यास्त होईल तिथेच भक्तांच्या उद्धारासाठी मी कायमस्वरूपी राहील. देवी जेव्हा कोराडी गावात आली तेव्हा सुर्यास्त झाला अन् देवी तिथेच थांबली. तीच ही कोराडीची जगदंबा माता होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.