Navratri 2024: कुरुंदा येथे निसर्गाच्या सान्निध्यात टोकाईदेवी, सात देवींच्या मूर्ती, नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी

Navratri 2024:येथे उंच गडावर असलेल्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आल्याने निसर्गाच्या सान्निध्यात मंदिर आहे. या मंदिरात सात देवीच्या मूर्ती आहेत.
Navratri 2024:
Navratri 2024:Sakal
Updated on

Navratri 2024: हिंगोली जिल्ह्यातील टोकाईगडावर असलेल्या टोकाईदेवीच्या मंदिरात नवरात्रात भाविकांची मोठी गर्दी होते. येथे उंच गडावर असलेल्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आल्याने निसर्गाच्या सान्निध्यात मंदिर आहे. या मंदिरात सात देवीच्या मूर्ती आहेत.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील टोकाई गडावर हे मंदिर आहे. येथून वसमत व नांदेड शहर जवळ असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. परिसरात असलेल्या कुरुंदा, कोठारी, गिरगाव, रेडगाव, वडगाव आदी गावांतील भाविक येथे दर्शनासाठी येतात. यामध्ये अनेक जण अनवाणीदेखील येतात. मंदिरात दररोज सकाळ, सायंकाळी आरती व प्रसादाचे वाटप केले जाते. अष्टमीला होमहवन तर नवमीला महाप्रसादाचे वाटप केले जाते. या मंदिरात सात देवीच्या मूर्ती आहेत.

येथे दररोज येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता यात्रेचे स्वरूप येते. मंदिर परिसरात बेलफूल विक्री, प्रसाद व धार्मिक साहित्य विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणावरून चार दिशेला जाणारे रस्ते असल्याने वसमत, कळमनुरी, औंढा व नांदेड जिल्ह्यातील भाविक येतात.

Navratri 2024:
Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

शतकापूर्वी उभारलेले मंदिर

टोकाईदेवी मंदिर हे एका शतकापुर्वी उभारण्यात आले आहे. या भागात केवळ एकच डोंगर होता. या डोंगरावर देवीचे छोटेखानी मंदिर होते. त्यानंतर गावकऱ्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. नंतर येथे देवीचे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या पायथ्याशी शिवकालीन बारव आहे. या मंदिरात नंतर नवरात्रात घटस्थापना सुरू झाली. ती आज पर्यंत कायम आहे. तसेच चैत्र महिन्यात येथे देवीची यात्रा असते. या टोकाई गडावर चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट देऊन येथे सह्याद्री देवराई परिवार व गावकऱ्यांच्या मदतीने २५ हजार वृक्षांची रोपटी लाऊन त्याचे संगोपन केले आहे. यामुळे हा परिसर हिरवाईने नटला आहे. दरवर्षी नवरात्रात येथे भाविकांची गर्दी असते.

टोकाईदेवी मंदिरात दररोज सकाळ सायंकाळी पूजा, आरतीनंतर प्रसादाचे वाटप केले जाते. याठिकाणी भाविकांचे मोठी गर्दी असते. याशिवाय चैत्र महिन्यात देवीची यात्रा असते. या गडावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन झाल्याने हा परिसर हिरवाईने नटला असल्याने गडावर शालेय सहली व पर्यटक, भाविक वर्दळ नेहमीच असते.

- कैलास स्वामी, पुजारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.