Dhule Ekvira Devi : एकवीरादेवी मंदिरात तयारी पूर्ण; नवरात्रोत्सवात मंदिर 24 तास खुले

Ekvira Devi : महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ, खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
Shri Ekvira Devi
Shri Ekvira Deviesakal
Updated on

धुळे : महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ, खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली. एकवीरादेवी मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे. घटस्थापनेनंतर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढेल. वाहतुकीची कोंडी होऊ नये, त्यासाठी मंदिरापासून काही अंतरावर पार्किंगची सोय असेल. (Ekvira Devi Temple is open for 24 hours during Navratri festival )

श्री एकवीरादेवी मंदिरात गुरुवार (ता. ३)पासून नवरात्रोत्सव १६ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाईल. यात गुरुवारी सकाळी दहाला मंदिरात घटस्थापना करण्यात येईल. विश्व कल्याणासाठी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान शतचंडी याग होमहवन होईल. ७ ऑक्टोबरला सकाळी दहाला १०१ कुमारिकापूजन, ११ व १२ ऑक्टोबरला होमहवन, शतचंडी, यज्ञ पूर्णाहुती होईल. १२ ऑक्टोबरला महानवमी सुवासिनीपूजन होईल. १२ ऑक्टोबरला दसरा उत्सव साजरा केला जाईल. कोजागरी पौर्णिमा उत्सव १६ ऑक्टोबरला साजरा करण्यात येईल. दुपारी बाराला आरती होईल. नंतर मंदिर परिसरात पालखी सोहळा साजरा केला जाईल. सायंकाळी सातला देवीला ५६ भोग नैवेद्य अर्पण करण्यात येईल. (latest marathi news)

Shri Ekvira Devi
Dhule News : एकवीरादेवी मंदिर परिसरात माणुसकीची भिंत; महापालिकेतर्फे उपक्रम

पोलिस बंदोबस्त तैनात

खानदेश कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी धुळे जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून भाविक येतात. नवरात्रोत्सवात भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ व्हावे, यासाठी विश्वस्त मंडळाने मंदिर चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मंदिरातील स्वयंसेवकही पोलिसांच्या मदतीला राहणार आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त गुरव यांनी दिली.

दुप्पट रोजगाराची पर्वणी

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवीच्या मंदिर परिसरात दुकानदारांनी स्टॉल लावण्यास सुरुवात केली आहे. रोजगाराच्या पर्वणीमुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा जास्त दुकानदार दाखल झाले आहेत. मंदिरापासून ते जवाहर कुस्ती स्टेडियमपर्यंत दुकाने थाटण्यात आली आहते. नेहरू चौकातून मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरही दुकाने लावली जात आहेत. विक्रेत्यांनी मंदिर परिसरात स्वच्छतेस प्राधान्य दिले. तात्पुरत्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केले आहेत.

Shri Ekvira Devi
Ekvira Devi Yatrotsav : एकवीरादेवी यात्रेनिमित्त उलाढालीची पर्वणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.