Dhule News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत धुळे मनपाच्या मदत केंद्रांवर प्राप्त अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची दुसरी तात्पुरती यादी बुधवारी (ता. २४) प्रसिद्ध करण्यात आली. एकूण दोन हजार ४३४ लाभार्थ्यांची ही यादी आहे. दरम्यान, २० जुलैला (शनिवारी) प्रसिद्ध पहिली यादी एक हजार २९८ लाभार्थ्यांची होती. अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्या उपस्थितीत लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली. (Ladki Bahin Yojana)
या वेळी उपायुक्त हेमंत निकम, उपायुक्त शोभा बाविस्कर, मनपा महिला व बालकल्याण कार्यालयाच्या मीना सातभाई आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलांना मिळावा यासाठी योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी धुळे महापालिकेतर्फे धुळे शहरात प्रभागनिहाय मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मदत केंद्रांवर प्राप्त अर्जांची छाननी करून लाभार्थी महिलांची यादी प्रसिद्ध करण्याचे महापालिकेने ठरविले. त्यानुसार दर बुधवार व शनिवारी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत शनिवारी (ता. २०) पहिला यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (ता. २४) दुसरी यादी प्रसिद्ध झाली. सुमारे दोन हजार ४३४ लाभार्थ्यांची ही यादी आहे. (latest marathi news)
दरम्यान, योजनेंतर्गत अर्ज स्वीकृतीची ३१ जुलै अंतिम मुदत आहे. मदत केंद्रांवरील प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून तात्पुरती यादी प्रसिद्ध करून तसेच त्यावर प्राप्त हरकतीचे निराकरण करण्याबाबत शासन निर्णयात नमूद केले आहे. सूचना प्राप्त झाल्यानंतर छाननी झालेले अर्ज शासनाच्या पोर्टलवर अपलोड केले जातील. धुळे महापालिकेच्या वेबसाइटवरदेखील लाभार्थ्यांच्या प्रसिद्ध केलेल्या याद्या उपलब्ध करण्यात येणार आहेत.
हरकती नियंत्रण कक्षाकडे
प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीबाबत लाभार्थ्यांच्या हरकती प्राप्त झाल्यास प्रत्येक केंद्रावर हरकत नोंद करण्यात येणार आहे. केंद्रनिहाय प्राप्त हरकतींची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व अर्जदार लाभार्थी महिलांनी याची नोंद घ्यावी व महापालिकेत सहकार्य करावे, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.