Navratri 2024 : नांदुरी- सप्तशृंगगड दरम्यान नवरात्रोत्सवात 130 बस धावणार

Navratri 2024 : राज्यातील शक्तिपीठांपैकी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सवाला गुरुवार (ता. ३)पासून प्रारंभ होणार आहे.
ST Bus
ST Busesakal
Updated on

वणी : राज्यातील शक्तिपीठांपैकी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सवाला गुरुवार (ता. ३)पासून प्रारंभ होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३ ते १२ ऑक्टोबर व कोजागरी पौर्णिमा उत्सवानिमित्त १६ व १७ ऑक्टोबरला गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली असून, या मार्गावर लाल परी भाविकांची वाहतूक करणार आहे. (130 buses will run between Nandura and Saptshringigarh during Navratri festival )

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नांदुरी ते सप्तशृंगगड या दरम्यान १३०, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारातून १६५ बसचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सप्तश्रृंगगडावर नवरात्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. विशेषतः नाशिक जिल्ह्यासह पुणे, अहमदनगर, मुंबई, छत्रपती संभाजीनगरसह खानदेश व गुजरातमधून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. भाविकांची संख्या लक्षात घेऊन यात्रोत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनाने गडावर येण्या-जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी केली आहे.

भाविकांना वेळेत व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी एसटी प्रशासनाने अगोदरपासूनच जादा बसचे नियोजन केले. यात्रा कालावधीसाठी परिवहन महामंडळातर्फे नांदुरी येथे गडाच्या पायथ्याशी व गडावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ तात्पुरते वाहतूक केंद्र तयार करण्यात येत आहे. नाशिक येथे नवीन सीबीएस (ठक्कर बझार) बसस्थानकात यात्रा वाहतूक केंद्र असेल. नवरात्रोत्सवात भाविकांना सुरक्षित वाहतूक व सुविधा देण्यास राज्य परिवहन महामंडळ सज्ज असल्याची माहिती नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिया व कळवण आगार नियंत्रक दादाजी महाजन यांनी दिली आहे. (latest marathi news)

ST Bus
Navratri 2024 : स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आसरामाता मंदिर

नांदुरी ते सप्तशृंगगड असे असेल नियोजन

नांदुरी ते सप्तशृंगगड या दरम्यान ३ ऑक्टोबरला ७० बस, ४ ला ११०, ५ ला १२० व ७ ते १२ ऑक्टोबरदरम्यान रोज १३० बस भाविकांची वाहतूक करतील.

नाशिक विभागातील १३ आगारांतून बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, गर्दीच्या प्रमाणानुसार अधिकच्या जादा बसचे नियोजनही होईल. याशिवाय, धुळे व जळगाव जिल्ह्यांतील आगारांतूनही ५० बस धावणार आहेत.

भाविकांसाठी सुविधा व सुरक्षा...

@ भाविक प्रवाशांसाठी नांदुरी (पायथा) व गडावर वॉटरप्रूफ निवारा, प्रतीक्षा शेड

@ चालक व वाहक यांची मद्यसेवन चाचणी होऊन कर्तव्यावर नेमणार

@ दिवाबत्तीची पुरेशी व्यवस्था, नांदुरी येथे जनित्र

@ प्रवाशांसाठी नांदुरी व गडावरील बसस्थानकात स्वच्छ पाणी दोन टॅंकरद्वारे उपलब्ध

@ नांदुरी व सप्तशृंगगड येथील वाहनतळावर इंधन देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सुट्या भागांच्या पुरवठ्यासह कार्यशाळा कर्मचारी

@ क्रेनच्या व्यवस्थेसाठी तीन सत्रांत कर्मचारी नियुक्ती

@ भाविक तसेच घाटात चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी यू टर्न, गणपती टप्पा, मंकी पॉइंट या भागात महामंडळाकडून विशेष कर्मचारी, त्यांना इंडीकेटर बॅटरी व जॅकेटची व्यवस्था

ST Bus
Navratri 2024: शारदीय नवरात्रीत माता दुर्गेच्या 9 रूपांना 'हे' पदार्थ करा अर्पण, संकट होतील दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.