नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण हा निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा होता. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत मतदानासाठी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही मतदानात सहभाग घेतला. सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत सरासरी ६०.११ टक्के मतदान झाले. यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सायंकाळी पाचपर्यंत एकूण ३० लाख ४२ हजार ३६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.