Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे 50 हजार अर्ज अपात्र; तिसरा हप्ता

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच जमा होणार असल्याने पात्र होण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaEsakal
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच जमा होणार असल्याने पात्र होण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख १७ हजार २५२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यात पडताळणीनंतर १३ लाख ६६ हजार ६६४ अर्ज मंजूर करण्यात आले. म्हणजे ५० हजार ५८८ लाडक्या बहिणींचे अर्ज नामंजूर झाले. राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना एक हजार ५०० रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येत आहे. ( 50 thousand applications of ladki bahin yojana eligibility )

या योजनेसाठी प्राप्त अर्जांची तालुकास्तरावर छाननी करण्यात आली असून, अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, तालुका समितीने स्वीकृत केलेले अर्ज विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अंतिम निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. त्यातील बहुतांश बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सात लाख ३८ हजार १७ अर्ज हे ऑफलाइन जमा झाले. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : पोस्टाला लाडकी बहीण पावली! मराठवाडा, खानदेशात ८ लाख ५९ हजार २४९ महिलांनी उघडले खाते

सहा लाख ७९ हजार २३५ अर्ज हे ऑनलाइन नोंदविले गेले. त्यातील दोन हजार ६७ अर्ज तपासणीचे काम सुरू आहे. जवळपास ९३ टक्के अर्ज मंजूर झाले. जुलै २०२४ पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे.

एक लाख ४३ हजार खाते ‘निराधार’

योजनेच्या लाभासाठी महिलेचे खाते बँक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे; परंतु नाशिक जिल्ह्यात सुमारे एक लाख ४३ हजार ६८३ लाभार्थी महिलांचे खाते आधार लिंक नसल्याने या लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागले. त्यातील बहुतांश लाभार्थ्यांनी आता बँकेत जाऊन बँक खाते आधारशी लिंक केले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : फोटो महिलेचा अन् आधार कार्ड पुरुषाचे! ‘बहिणीं’च्या पैशांवर भामट्यांची ‘दादा’गिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.