Gharkul Yojana : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच निधीचे वितरण!

Nashik News : घरकुल योजनांपासून नागरिक वंचित राहू नये यासाठी घरकुल योजनांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आदेश मंत्री भुजबळ यांनी प्रशासनाला दिलेले आहे.
Gharkul Yojana
Gharkul Yojanaesakal
Updated on

Nashik News : येवला तालुक्यातील रमाई, शबरी व मोदी आवास घरकुल योजनेचे ४४६ प्रकरण मंजूर करण्यात येऊन त्यांना पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे. घरकुल योजनांपासून नागरिक वंचित राहू नये यासाठी घरकुल योजनांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आदेश मंत्री भुजबळ यांनी प्रशासनाला दिलेले आहे. (Distribution of funds to beneficiaries of Gharkul Yojana soon)

त्यानुसार रमाई घरकुल योजनेचे २१८, शबरी घरकुल योजनेचे १३६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून पुढील दोन दिवसात पहिल्या हफ्त्याचे वितरण होणार आहे. तर मोदी आवास घरकुल योजनेचे ९२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यांना येत्या १५ दिवसांत पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर तालुक्यातील १९१ शेतकऱ्यांचे गाई गोठ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. या गोठ्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. तसेच कलाकार कलावंत मानधन योजनेचे ११ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. (latest marathi news)

Gharkul Yojana
Nashik News : अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास बंदी! अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांचे आपत्ती विभागाला निर्देश

सावरगावला सोमवारी शिबिर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ करून देण्यासाठी यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २९ जुलैला तालुक्यातील सावरगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Gharkul Yojana
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.