Nashik News : शासनाची ‘लाडकी बहिण’ योजना अमलात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी तत्पर आहे. मात्र, या योजनेला सोशल मीडियावर वेगवेगळे विनोद, चुटकुले, चित्रफीत तयार करून ट्रोल केले जात आहे. अशा प्रकारच्या गोष्टीं पसरविणाऱ्यांपेक्षा तयार करणाऱ्यांवर शासनाने बंदी घातली पाहिजे, असा सूर निघत आहे. (Ladki Bahin Yojana)
‘लाडकी बहिण’ योजना ही साक्षर भारताचे एक लक्षण आहे. काही महिला-पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. परंतु, काही महिला या घर सोडून कुठेही बाहेर गेलेल्या नाती. त्यांना बँकेची ओळख झाली. आधार कार्ड आणि जन्म दाखला, त्यावर तारखेचे साम्य कळाले. पतीने या बारीक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आज स्वतः सक्षम झाल्याचे दिसत आहे.
परंतु, सोशल मीडियाने जास्त गांभीर्य घेऊन खूप विनोद तयार केले. ‘मतांची आली कडकी, म्हणून बहिण झाली लाडकी, ना बहिण लाडकी आहे ना भाऊ खरा क्रिकेट पटू घेऊन गेले कोटी अकरा, बहिण अजून मारतेय तलाठ्याकडे चकरा, १५ लाखांपासून सुरू झालेला प्रवास शेवटी पंधराशे रुपयांवर संपला’ असे म्हणत योजनेवर हास्यविनोद केले जात आहे. (latest marathi news)
भाऊ बहिणीच नातं भावाने सांगावं आणि बहिणीने भर पावसात कागदपत्र घेऊन फिरावं, शाब्बास रे शासन, मुख्यमंत्री माझा शालक. दारोड्या पाहुणा, असे असंख्य विनोद सोशल मीडियावर झळकत आहे.
महिलेचा व्हावा सन्मान
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबविताना ज्या महिला सासू-सासऱ्यांचा सांभाळ करीत असतील अशा महिलांनाच लाभ देण्यात यावा, अशा प्रकारचा संदेश टाकून योजना ट्रोल होताना दिसत आहे. या योजनेची माहिती घेऊन तिचे भांडवल न करता महिलांना माहिती देऊन तिचा सन्मान राखला पाहिजे, असाही मतप्रवाह आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.