Jarange Patil Rally : जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप; अखंड मराठा समाज बैठकीत रॅलीचे नियोजन

Jarange Patil Rally : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्रभर सुरू असलेल्या शांतता रॅलीचा समारोप १३ तारखेला नाशिकमध्ये होणार आहे.
Community members who participated in Akhand Maratha Samaj meeting here.
Community members who participated in Akhand Maratha Samaj meeting here.esakal
Updated on

Jarange Patil Rally : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्रभर सुरू असलेल्या शांतता रॅलीचा समारोप १३ तारखेला नाशिकमध्ये होणार आहे. या रॅलीच्या तयारीसाठी शनिवारी (ता.३) येथे अखंड मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीत शांतता रॅली समारोप कार्यक्रम नियोजनाबाबत चर्चा झाली. यावेळी अखंड मराठा समाजाचे नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील समन्वयक उपस्थित होते. (manoj Jarange Patil peace rally concludes in city )

ही रॅली ७ ऑगस्टपासून सुरू होत असून सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर अशा मार्गाने नाशिकमध्ये १३ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे. रॅली नियोजनात समितीऐवजी जबाबदारी व्यवस्थापन नियुक्त केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील मराठा स्वयंसेवक जबाबदारी घेऊन रेकॉर्ड रॅली यशस्वितेसाठी मेहनत घेणार आहेत. रॅलीमध्ये सुरवात ते समारोप या विषयी चर्चा करून नियोजन केले.

पार्किंग, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, संपूर्ण शहरात साउंड सिस्टिम, बॅनर व्यवस्था, निवेदक, बिछायत, जनरेटर व्यवस्था, महिला-पुरुष व्यवस्था, स्वागत, छत्रपती शिवरायांना अभिवादन, निवास व्यवस्था, स्वयंसेवक व्यवस्था, पाणी बॉटल व्यवस्था, कमान ध्वज व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, तालुकास्तर दैनंदिन संवाद या सर्व जबाबदारी घेणाऱ्‍या मराठा स्वयंसेवकांवर नियंत्रण समिती याविषयी बैठकीत निर्णय घेण्यात आले. (latest marathi news)

Community members who participated in Akhand Maratha Samaj meeting here.
Manoj Jarange Patil: जरांगे-पाटील 2 ऑगस्टला होणार न्यायालयात हजर, नेमकं काय आहे प्रकरण?

जिल्हयात गावपातळीवर संवाद रॅलीची व्यापक जनजागृती करण्यात येत असून तिला अधिक वेग देण्यासाठी जनजागृती साहित्याचे वितरण केले. मुसळधार पाऊस असला तरी रॅली शिस्तबद्ध होण्यासाठी उपाययोजना पार्किंग व्यवस्था अतिशय चांगली राहण्यासाठी चर्चा करून निर्णय घेतले. शांतता रॅलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण तसेच यावेळी तज्ञांकडून प्रशिक्षण देणार, निवेदन करणाऱ्‍यांना आचारसंहिता देण्यात येणार आहे.

असे आहे नियोजन

अखंड मराठा समाजाव्यतिरिक्त वैयक्तिक बॅनरबाजी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. लाखो समाज बांधव येणार असल्यामुळे स्क्रीन टॉवर उभारणे व तीस वॉकी टॉकीच्या माध्यमातून नियोजनबद्ध रॅलीत देखरेख राहणार आहे. वैद्यकीय सेवा, मराठा कुणबी जोडपे एकत्र करणे यासह अनेक विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले. रॅलीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कॅमेऱ्‍यांची नजर संपूर्ण रॅली परिसरात ठेवणार आहे. गावपातळीवर मूळपत्रिका वितरणाला रविवारपासून सुरवात झाली आहे. या बैठकीला येवला, नाशिक, दिंडोरी, नांदगाव, निफाड, मालेगाव, चांदवड येथील हजारो मराठा बांधव उपस्थित होते.

Community members who participated in Akhand Maratha Samaj meeting here.
Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटलांचा काय असेल प्लॅन?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.