Manoj Jarange Patil Rally : मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी (ता. १३) नाशिकमध्ये होत असून, यात मनोज जरांगे-पाटील सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणावरून मराठा व ओबीसी नेते आमनेसामने आले आहेत. त्यामुळे रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिस सतर्क झाले असून, शहरातील सुमारे दोनशे ते अडीचशे जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत; तर काहींना रात्रीतून ताब्यात घेणार आहेत. (Manoj Jarange Patil police alert in city today )