नाशिक : मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर या रॅलीला काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांना शहर भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. सायंकाळी सभा आटोपल्यानंतर घोडके यांची सुटका करण्यात आली. शहरात मंगळवारी (ता. १३) मराठा आरक्षणासंदर्भात रॅली आणि मनोजे जरांगे पाटील यांची सभा होती. (Arrest and release of Gaju ghodke)