Ladki Bahin Yojana : ग्रामीण भागात लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांच्या बहिणींची धावाधाव

Nashik News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते हे महत्त्वाचे असल्याकारणाने त्यासाठी ग्रामीण भागात 75 टक्के महिलांची बँक खातेच उघडली नसल्याची बाब समोर येत आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

नांदूर शिंगोटे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळाने एकत्रित निर्णय घेऊन लाडकी बहिण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बहुतांशी ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या योजनेमुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून त्यासाठी सरकारकडून पंधराशे रुपये महिना मिळणार असल्याकारणाने कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांची धावाधाव दिसून येत आहे. (Nandur Shingote Women rush for Ladki Bahin Yojana in rural areas)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते हे महत्त्वाचे असल्याकारणाने त्यासाठी ग्रामीण भागात 75 टक्के महिलांची बँक खातेच उघडली नसल्याची बाब समोर येत आहे. तर त्यासाठी महिला वर्गाला पॅन कार्ड, आधार कार्ड महत्त्वाचे असून त्यासाठी महिलावर्ग कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी आता स्वतःच रिंगणात उतरले आहे. फोटो पासून ते बँकेच्या खाते उघडण्यापर्यंत महिला स्वतः पुढे दिसून येत आहे.

बऱ्याच महिलांना यासाठी काय करावे लागते हे माहीत नसल्यामुळे कुठेतरी विचारपूस करून महिला एकेक कागद जमा करताना दिसत आहे. त्यामुळे फोटो स्टुडिओ, छोटी-मोठी सेवा केंद्र, ऑनलाईन सेवा केंद्र, झेरॉक्स सेंटर व त्यानंतर बँक या ठिकाणी महिला वर्ग प्रकर्षाने जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना बाहेर पडावे लागल्यामुळे कुठे काय करावे लागते व कुठे कोणती कागदपत्रे तयार होतात याचीही माहिती ग्रामीण भागातील महिलांना या निमित्ताने होऊ लागली आहे. यासाठी महिला वर्गाला मुख्यमंत्र्यांचे दाजी सुद्धा सहकार्य करत असून मुख्यमंत्री बहिणीला पंधराशे रुपये प्रति महिना देणार असल्यामुळे दाजींना सुद्धा काहीतरी मिळावी असे काही ठिकाणी दाजी बोलताना दिसून येत आहे. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Nashik District : ‘कलेक्टोरेट’च्या वैभवशाली 155 वर्षांचा विसर; जिल्ह्याला लाभले 105 जिल्हाधिकारी

ग्रामीण भागात तर शेतकरी वर्गाला शेती कामासाठी आता महिलाही मिळणे मुश्किल झाले आहे. शेती कामासाठी रोजंदारीवर महिलांना विचारले असता लाडकी बहीण योजनेचे कामात असल्यामुळे मी कामाला येणार नाही असे ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किती महत्त्वाची आहे हे महिला वर्गांना यामधून प्रकाशाने सांगावे वाटत आहे.

मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेचे बँक खाते या निमित्ताने मात्र निश्चितपणे उघडले जात असल्याचे प्रकर्षाने दिसून येत असून या निमित्ताने लाडकी बहीण आपल्या माहेरी जाऊन गुरुजींना आपले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मागत असून त्या ठिकाणीही गुरुजी दप्तरे शोधून महिलांना सहकार्य करताना दिसून येत आहे.

तर काही ठिकाणी आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला यामध्ये जन्मतारीख अथवा नावामध्ये थोडाफार बदल हा झालेला असल्याकारणाने या बदलामुळे मला पंधराशे रुपये मिळतील की नाही असे महिला वर्गाला वाटत आहे. मात्र शासनाकडून सांगण्यात आले त्या पद्धतीने आपण माहिती भरा कुणीही महिला यामधून वगळली जाणार नाही. त्यामुळे आता महिलावर्ग बिंदिक्तपणे ऑनलाईन व ऑफलाईन लाडकी बहीण योजना फॉर्म भरताना दिसून येत आहे.

Ladki Bahin Yojana
Nashik News : हमाली, तोलाईचा वाद पुन्हा उफाळला! मनमाडला कांदा, भुसार मालाचे लिलाव बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.