Nashik Navratri 2024 : कोटमगावी जगदंबेचरणी लाखावर भाविक! पाचव्या माळेला गर्दीने फुलेला मंदिर परिसर

Latest Navratri 2024 News : देवी मंदिर परिसरातील आकर्षक रोषणाई, रहाटपाळणे व त्यावरील रोषणाईने यात्रेला देखना लूक मिळाला असून लाखोंची उलाढाल होत आहे.
Kotamgaon Mandir Devotees Crowd
Kotamgaon Mandir Devotees Crowdesakal
Updated on

येवला : कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या चरणी लाखावर भाविक लिन झाले. शनिवार, रविवारची सुट्टी तसेच सोमवार (ता.७) पाचवी माळ असल्याने दर्शनासह यात्रेचा आनंद भाविकांनी लुटला. रोज सकाळी आठपासून सुरू होणारा गर्दीचा महापूर रात्री अकरापर्यतत सुरूच असतो. दरम्यान, देवी मंदिर परिसरातील आकर्षक रोषणाई, रहाटपाळणे व त्यावरील रोषणाईने यात्रेला देखना लूक मिळाला असून लाखोंची उलाढाल होत आहे. (Kotamgavi Jagdamba mata Lakh Devotees visited)

कोटमगाव येथील नवसाला पावणाऱ्या श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या तीन देवींचे एकरूप जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. नाशिकसह नगर, औरंगाबाद, धुळे आदी जिल्ह्यातून लाखो भाविक येथे दर्शनाला येत आहेत. रोजच १० ते १५ हजाराच्या आसपास भाविक देवीचे दर्शन घेतात. शनिवारी सुमारे २५ ते ३० हजारांवर तर रविवारच्या सुट्टीमुळे ५० हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले.

देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक माळेगणिक भाविकांची गर्दी वाढत आहे. भक्तांमुळे कोटमगाव अक्षरशः फुलून गेले आहे. ग्रामीण भागातून पिकअप, ट्रॅक्टरमध्ये कुटुंब दर्शनासाठी येत आहेत. गर्दीमुळे नाशिक औरंगाबाद महामार्ग वाहनांच्या पार्किंगने दुतर्फा भरून जात आहे. दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

दररोज पहाटे येवल्यातील दोन ते तीन हजार भाविक पायी कोटमगाव येथे दर्शनासाठी जात असून सायंकाळीही सातनंतर अकरापर्यंत शहरातील भाविकांची गर्दी कायम राहत आहे. देवी मंदिर रोषणाईने उजळून निघाले असल्याने सायंकाळी देखील येवलेकर कुटुंबासह कोटमगावचा रस्ता नित्यनियमाने धरत असल्याने रात्रीच्या अकरापर्यत येथील गर्दी कमी झालेली नसते. (latest marathi news)

Kotamgaon Mandir Devotees Crowd
Navratri 2024 : जमदग्नी ऋषींनी परशुरामांना रेणुका मातेचं शीर धडावेगळं करण्याचा आदेश का दिला ?

किंबहुना सायंकाळी दर्शन आणि यात्रेतच विविध पदार्थ खाण्याचा आनंदही अनेक कुटुंबीय लुटत आहेत. दररोज सायंकाळी नऊला अतिथींच्या हस्ते देवीची आरती केली जात आहे. मंदिरासमोरील प्रांगणात घटी बसलेल्या भाविकांसाठी दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

कोटमगाव रोषणाईने उजळले!

येथील देवी मंदिरावर केलेली सुंदररोषनाई तसेच राहट पाळणे व इतर खेळण्यावरही प्रकाशदिवे उजळले असून विविध हॉटेल, दुकानांमध्येही लाईट लावले असल्याने रात्रीच्या वेळेस हा संपूर्ण परिसर प्रकाशमय झालेला दिसतो. याचमुळे शहरास ग्रामीण भागातही अनेक जण रात्री येथे येऊन दर्शनाचा व यात्रेचा आनंद लुटण्याचा आस्वाद घेतात.

Kotamgaon Mandir Devotees Crowd
Navratri 2024 : नवरात्रीचा सहावा दिवस अशी करा माता कात्यायनीची पूजा, देवीसमोर वाचा पौराणिक कथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.