Nashik Women Traffic Police : पोलीस म्हटले की समाजाकडून सन्मानापेक्षा तिरस्काराचीच नजर अधिक असते. त्यातही महिला पोलीस असेल तर बऱ्याच अनेक समस्यांना तिला सामोरे जावे लागते. २४ तास कर्तव्यदक्ष असलेला पोलिसी पेशात वाहतूक शाखेत असलेल्या महिलांना तर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून शहराच्या चौकांमध्ये उभे राहत बेशिस्त वाहनचालकांच्या अरेरावीला तोंड द्यावे लागते. असे असले तरीही महिला वाहतूक पोलीस अधिक तत्परतेने आपली जबाबदारी पार पाडतात. (Women traffic police discipline traffic system of city)
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक वाहतूक शाखेमध्ये २४५ पुरुष तर ३० महिला वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. वाहतूक पोलीस शाखेत काम करीत असताना, पुरुष असो वा महिला यांना रस्त्यावरच आपले कर्तव्य बजवावे लागते. पुरुष वाहतूक पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून महिला वाहतूक पोलीसही तितक्याच मेहनतीने आपली जबाबदारी पार पाडतात. कधी-कधी तर महिला वाहतूक पोलिसांना १२ तासांपेक्षाही अधिक तास कर्तव्य बजवावे लागते.
वाहतूक पोलीस म्हटले की बेशिस्त वाहनचालकांची अरेरावीही सहन करावी लागते. बेशिस्त वाहनचालक हे सुशिक्षित असूनही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर चूक मान्य करण्याऐवजी वाहतूक पोलीसांशी हुज्जत घालतात. तशीच हुज्जतींचा सामनाही महिला वाहतूक पोलिसांना करावा लागतो.
अनेकदा तर टवाळखोर ट्रीपलसीट दुचाक्या पळवतात. अशांना अटकाव करताना असे टवाळखोर महिला पोलीस पाहून अधिकच अरेरावी करताना कधी कोणा भाईचा, कोणा अधिकाऱ्याचा फोन लावून त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला जातो. परंतु महिला वाहतूक अंमलदार कोणत्याही दबावाला न जुमानता कायदेशीर कारवाई केली जाते. (latest marathi news)
कौटुंबिक जबाबदारी
महिला वाहतूक पोलीसाची कर्तव्य बजावत असताना त्या महिलेला कौटुंबिक जबाबदारीही तितक्याच सक्षमतेने पेलावी लागते. वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत असताना महिला अंमलदारांना सकाळी आठला कर्तव्यावर हजर असावे लागते.
अशावेळी घरातील मुलांचा सांभाळ, त्यांची शाळा, घरकाम, कौठुंबिक सदस्यांची देखरेख या बाबी तिच्या चुकता चुकत नाहीत. एवढेच नव्हे तर सणवारालाही तिला इतर महिलांप्रमाणे सुट्टी मिळतेच असे नव्हे. त्यामुळे तिच्या वैयक्तिक हौसेलाही मुरड घालावी लागते.
"वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत असताना त्याकडे सकारात्मकतेने पाहिले की कर्तव्य बजावणे सोपे जाते. किमान १२ तासांची ड्युटी करीत असताना अनेक प्रकाराच्या वाहनचालकांशी संपर्क येतो. परंतु नियमाप्रमाणे जे असेल ते केले जाते. कौठुंबिक जबाबदारी सांभाळून नोकरीचे कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे आहे."- मीना धिवरे, महिला हवालदार, शहर वाहतूक शाखा.
"पोलीस दलात अलिकडे महिला अंमलदारांचे प्रमाण वाढते असून ही बाब सुखद वाटते. एका महिलेसाठी कौटुंबिक जबाबदारी पेलून पोलीस दलात कर्तव्य बजावणे सोपे नाही. परंतु सर्व समस्यांवर मार्ग काढून सकारात्मक दृष्टिकोनातून कर्तव्य बजावता येते."
- प्रमिला आहिरे, महिला हवालदार, शहर वाहतूक शाखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.