Nashik Navratri Festival 2024 : वणी गडावरील सप्तशृंगी देवीचे प्रतिरूप : सांडव्यावरची देवी

Latest Navratri 2024 News : तब्बल पावणे तीनशे वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी झाल्याचे सांगितले जाते. भाविकांच्या मनाला प्रसन्न करणारी १८ भुजाधारी देवी नवसाला पावणारी म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे.
saptashrungi devi & sandvyavarchi devi
saptashrungi devi & sandvyavarchi deviesakal
Updated on

पंचवटी : देवीच्या साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धे पीठ समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप म्हणजे शहरातील गोदाकाठी वसलेली सांडव्यावरची देवी होय. तब्बल पावणे तीनशे वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी झाल्याचे सांगितले जाते. भाविकांच्या मनाला प्रसन्न करणारी १८ भुजाधारी देवी नवसाला पावणारी म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे. (Navratri Festival 2024 sandvyavarchi devi)

पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दर हे वणीच्या जगदंबेचे परमभक्त होते. घोड्यावरून रोज ते वणीला दर्शनासाठी जात. पुढे वार्धक्यामुळे त्यांना दर्शनाला जाणे शक्य होत नसे. त्यावेळी त्यांनी जगदंबेला साकडे घातले. यानंतर देवीने त्यांना साक्षात्कार दिला व मीच तुझ्या घरी येईन, असा आशीर्वाद दिला.

फक्त मी येताना तू मागे वळून पाहायचे नाही. तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील त्याच ठिकाणी मी स्तब्ध होईल, अशी अट देवीने त्यांना घातली. नारोशंकरजींचा घोड्यावर प्रवास सुरू झाला आणि त्या पाठोपाठ देवीही होती. प्रवास सुरू असताना देवीच्या पैंजणांचा आवाज येत होता.

परंतु, सरदार चौकात येताच आपणच बांधलेल्या मंदिरात नारोशंकर यांना महादेवाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली, ते दर्शनासाठी वळले आणि देवीच्या घुंगरांचा आवाज बंद झाला. आवाज का बंद झाला, हे पाहण्यासाठी नारोशंकरजी वळले आणि देवी तेथेच स्थानापन्न झाली. तेच हे ठिकाण म्हणजेच सांडव्यावरची देवी, या मंदिराच्या निर्मितीला आख्यायिका आहे.

मूर्तीचे जतन गरजेचे

गडावरील सप्तशृंग देवीचे दर्शन घेतल्यानंतर सांडव्यावरच्या देवीचेही दर्शन घेण्याची परंपरा आहे. नवरात्रनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या मंदिरासमोर मोठी लक्षवेधी दीपमाळही उभारलेली आहे. या मंदिरात पंचमीला गोंधळाचा कार्यक्रम होतो. अष्टमीच्या दिवशी होम व महापूजा होते.

आजही सरदार नारोशंकर राजेबहाद्दरांची अकरावी पिढी या मंदिराचा कारभार उत्तमरीत्या सांभाळत आहे. वीरासनात बसलेल्या या मूर्तीने आजवर अनेक पूर, महापूर अनुभवले आहेत. पूर आल्यानंतर देवी मूर्ती पाण्याखाली जाते. त्याचमुळे या मूर्तीच्या मूळ गाभ्यापर्यंत ओलावा कायम राहतो. मूर्तीवर नैसर्गिक गोष्टींचा होणारा थेट परिणाम यामुळे तिचे जतन व संवर्धन अत्यंत गरजेचे झाले होते. (latest marathi news)

saptashrungi devi & sandvyavarchi devi
Navratri 2024 : नवरात्रीचा सातवा दिवस, अशी करा माता काळरात्रीची पूजा, होईल मृत्यूचे भय दूर

देवीचे रूप अधिकच खुलले

नाशिकच्या मिट्टी फाउंडेशनचे अध्यक्ष व मूर्तिकार मयूर मोरे यांनी कोणत्याही प्रकारचे हानिकारक व कृत्रिम पदार्थांचे लेपण न करता अत्यंत बारकाईने व अभ्यासपूर्ण रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली आहे. मूर्तीच्या मूळ रचनेला कोणताही धक्का न लावता व कोणत्याही प्रकारची पृष्ठभागाची हानी न करता ही प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आहे.

हे संवर्धनाचे काम बारा दिवस चालले होते. या प्रक्रियेत मूर्तीच्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊन पक्केपणा देणाऱ्या रसायनांचा वापर करून व त्यामधील निसर्गतः होणारी रासायनिक प्रक्रिया व त्यामुळे होणारी झिज संथ होऊन मूर्तीला अधिक बळकटी मिळत आहे. मूर्तीवर होणारा ऊन, वारा तसेच पुराचे पाणी व पावसाचा, आर्द्रतेचा थेट परिणाम बघता, वेळोवेळी मूर्तीचे पूर्ण सर्वेक्षण केले जाते. त्यामुळे देवीचे रूप अधिकच खुलले आहे.

saptashrungi devi & sandvyavarchi devi
Navratri 2024 7th Colour: आज नवरात्रीचा शुभ रंग निळा, स्टायलिश लूक हवा असेल तर या अभिनेत्रींकडून घ्या आउटफिटची आयडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.