Saptashrungi Mata Mandir : नवरात्रोत्सवात सप्तश्रृंशी मंदिर 24 तास खुले! यात्रा नियोजन बैठकीत निर्णय; CCTV ची करडी नजर

Latest Navratri 2024 News : नवरात्रोत्सवात नऊ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज प्रशासनाच्यावतीने व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्वांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे.
Saptashrungi Mata Mandir
Saptashrungi Mata Mandiresakal
Updated on

कळवण : नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर हे २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला. (Navratri Festival Saptashrunshi Mandir Open 24 Hours)

३ ते १२ आक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कळवण येथील प्रांत तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी आकनुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक शुक्रवारी (ता. २०) झाली. बैठकीत विविध निर्णयांसह सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश देण्यात आले.

नवरात्रोत्सवात नऊ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज प्रशासनाच्यावतीने व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्वांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. तसेच गडावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी टोल नाक्यावर करावी, गडावर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर टाळावा अशा सूचना करण्यात आल्या आहे.

ट्रस्टतर्फे श्री भगवती मंदिर, सभा मंडप, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य, मोफत महाप्रसाद व्यवस्था तसेच परिसर बंदोबस्त, साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, करण्यात येणार असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त,जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शिंदे, सरंपच रमेश पवार आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (latest marathi news)

Saptashrungi Mata Mandir
Nitin Gadkari : भारताला विश्‍वगुरू बनवण्यासाठी गडकरींनी मांडली विकासाची चतुःसूत्री; तंत्रज्ञानातून भविष्य घडविण्याचा निर्धार

सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही

सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर व शिवालय तलावाच्या परिसरात एकूण ६५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच पहिल्या पायरीजवळ दोन व मंदिरात दोन असे चार मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहे. दरम्यान प्रदक्षिणा मार्ग बंद करण्यात आला आहे.

बैठकीतील ठळक मुद्दे

नांदुरी येथे वाहनतळ

यात्रोत्सवात खासगी वाहनांना बंदी

महत्त्वाच्या वाहनासाठी पासेस

स्वच्छतेसाठी कंत्राटी कामगार

वैद्यकीय सुविधा, रूग्णवाहिका

परिवहन महामंडळातर्फे ३७५ बसेस

अपघाती वळणाला वाहतूक नियंत्रण कक्ष

पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन

Saptashrungi Mata Mandir
Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्र 3 की ४ ऑक्टोबरला? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.