Navratri 2024 : नवरात्रोत्सवानिमित्त देवींच्या मूर्तींनी सजली बाजारपेठ; दीड ते 10 फुटापर्यंत मूर्ती

Navratri : नवरात्रोत्सवानिमित्ताने द्वारका भागात आकर्षक देवींच्यामुर्तींने बाजारपेठ सजली आहे. दीड ते दहा फुटापर्यंतच्या आकर्षक देवी मूर्ती विक्रीस दाखल झाल्या आहे.
Idols sold in Dwarka on the occasion of Navratri. In the second photograph, the idol of goddess inlaid with cashew nuts.
Idols sold in Dwarka on the occasion of Navratri. In the second photograph, the idol of goddess inlaid with cashew nuts.esakal
Updated on

जुने नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्ताने द्वारका भागात आकर्षक देवींच्यामुर्तींने बाजारपेठ सजली आहे. दीड ते दहा फुटापर्यंतच्या आकर्षक देवी मूर्ती विक्रीस दाखल झाल्या आहे. सप्तशृंगी आणि इतर देवींच्या मूर्तींना सार्वजनिक मित्र मंडळांकडून विशेष मागणी आहे. यातच काजू, बदाम आणि ड्रायफ्रूट वापरुन बनविलेली देवीची मूर्ती देखील सर्वांच्या आकर्षण ठरत आहे. गुरुवारी (ता.३) रोजी नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्वत्र तयारीस वेग आला आहे. (Navratri market is decorated with idols of goddesses ranging )

सार्वजनिक मंडळाकडून घटस्थापना आणि देवी मूर्ती स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दुसरीकडे द्वारका भागात विविध आकर्षक देवीमुर्तींची बाजारपेठ सजली आहे. रत्नजडित आकर्षक लहान मोठ्या देवी मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहे. १ हजार ५०० रुपयांपासून ५१ हजार रुपयांपर्यंत देवी मूर्ती विक्री होत आहे. कालिका देवी विविध रूपातील मूर्ती बाजारात उपलब्ध झाले आहे.

शहरासह ग्रामीण भागातील सप्तशृंगी देवीमुर्तीस अधिक मागणी असून त्यापाठोपाठ दुर्गादेवीची मूर्ती मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. सप्तशृंगी, रेणुका देवी, कालिका माता, सरस्वती, तुळजाभवानी, महालक्ष्मी अशा विविध देवी मूर्ती विक्रीस आल्या आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुर्त्यांच्या दरांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. कच्चा माल आणि कारागिर यांची मजुरी याचाही दरावर परिणाम झाला आहे. (latest marathi news)

Idols sold in Dwarka on the occasion of Navratri. In the second photograph, the idol of goddess inlaid with cashew nuts.
Navratri 2024 : गरबा, दांडिया आयोजनावर पोलिसांची राहणार करडी नजर; मर्यादेचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

काजू, बदाम जडीत मूर्तीचे आकर्षण

नवरात्र निमित्ताने बाजारात विक्री दाखल झालेल्या देवीमुर्तीमध्ये यंदा प्रथमच काजू,बदाम आणि इतर ड्रायफूट जडीत मूर्ती बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहे. भाविकांमध्ये मूर्ती आकर्षण ठरत आहे. त्यापाठोपाठ जाळीच्या साडीसह अन्य विविध प्रकारच्या साडीतील तसेच संपूर्ण रत्नजडित आणि फेटाधारी देवी मूर्तीही भाविकांना आकर्षित करत आहे.

''गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या दरांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. ड्रायफूट जडीत मूर्ती विशेष आकर्षण करत आहे.''- तन्मय अमृतकर विक्रेता

Idols sold in Dwarka on the occasion of Navratri. In the second photograph, the idol of goddess inlaid with cashew nuts.
Navratri 2024 :  यंदाच्या नवरात्रीचे रंग कोणते तुम्हाला माहितीयेत का? जाणून घ्या रंगांचे महत्त्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.