नाशिक : विविध बचत योजनांमधून चांगला परतावा देणाऱ्या योजनांमुळे टपाल खात्याकडे मध्यमवर्गीयांचा ओढा राहिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठीही महिलांची पहिली पसंती टपाल कार्यालयाला राहिली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील तब्बल दीड लाख महिलांची बचत खाती विविध टपाल कार्यालयातून काढण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाती काढली आहेत, तरीही बहुसंख्य महिलांनी यासाठी टपाल खात्यालाच पहिली पसंती राहिल्याचे दिसून येते. (One lakh accounts in post of ladki bahin yojana preferred by women across district )