वणी : उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी सप्तशृंगीच्या शारदीय नवरात्रोत्सवात गडावर भाविकांचा रीघ कायम असून, सूर्यादय तिथीनुसार गुरुवारी (ता. १०) सप्तमी उत्सव साजरा झाला. शुक्रवारी (ता. ११) अष्टमी व महानवमी एकाच दिवशी असून, शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार मध्यरात्री गडाच्या शिखरावर दरेगावचे गवळी-पाटील कीर्तिध्वज फडकणार आहेत. (saptahrungi devi midnight Adimaya kirtidhwaj will hoisted on summit)
बुधवार (ता. ९) सायंकाळी गडावर झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे भाविकांना निवारा शोधतांना चांगलीच तारांबळ उडाली. तसेच यात्रेसाठी आलेल्या व्यावसायिकांचे विक्रीसाठी असलेल्या वस्तूंचे नुकसानीपासून बचाव करण्यासाठी मोठी धांदल उडाली.
श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टने शिवालय तलाव परिसरात उभारलेल्या वॉटरप्रूफ मंडपाचा आधार मिळाला. दर्शन करून परतणाऱ्या भाविकांचीही या वेळी धावपळ उडाली. गुरुवारी सप्तमीनिमित्त अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते देवीची पंचामृत महापूजा झाली.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲड ललित निकम, मनज्योत पाटील, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, मंदिर विभागप्रमुख गोविंद निकम, सुनील कासार आदी उपस्थित होते. गुरुवारीही गड परिसरात पावसाचे सावट होते. (latest marathi news)
मात्र दर वर्षीप्रमाणे सप्तमीला होणारी गर्दी यंदा कमी झाल्याचे जाणवले. दरम्यान, शुक्रवारी (ता. ११) दुर्गाष्टमीनिमित्त आदिमायेच्या पादुकांची पालखी मिरवणूक तसेच नवमीनिमित्त गडाच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकणार आहे. त्यादृष्टीने ध्वजाचे मानकरी असलेले दरेगाव (वणी) चे एकनाथ गवळी पाटील कुटुंबीयांनी व न्यासाने कीर्तिध्वजाच्या पूजाविधीची तयारी पूर्ण केली आहे.
शुक्रवारी दुपारी साडेतीनला न्यासाच्या कार्यालयात कीर्तिध्वजाचे विधिवत पूजन होऊन ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. तसेच सायंकाळी पाचला देवी मंदिरात शतचंडी याग व होमहवनास प्रारंभ होईल. रात्री बाराला कीर्तिध्वज गडावर फडकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.