नाशिक रोड : गांधीनगरच्या रामलीलेत अनेक कलाकारांची ही दुसरी आणि तिसरी पिढी सध्या काम करत आहे. रामलीलेची सुरवात ज्यांच्या डोळ्यांदेखत झाली असे दिलबायगराय चुनिलाल त्रिखा (वय ७७) हे गेल्या ५५ वर्षांपासून रामलीलेत भक्तिभावाने काम करतात. त्यांनी सलग ४५ वर्ष लक्ष्मणाची भूमिका तर ११ वर्षांपासून कैकैची भूमिका करीत आहेत. (third generation working in Gandhinagar Ramleela)
त्रिखा हे गांधीनगर प्रेसमध्ये ऑपरेटर या पदावर काम करीत होते. गांधीनगर प्रेसमधून ते सेवानिवृत्त झाले. सध्या ते गांधीनगर वसाहतीतच वास्तव्यास आहेत. त्यांच्या वडिलांनंतर त्यांनी या प्रेसमध्ये नोकरी केली. वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी गांधी नगरची रामलीला पाहिली आहे. सध्या त्यांचे जावई कपिल देव शर्मा, मुलगी मंजू शर्मा आणि नात सहील व पायल शर्मा या रामलीलेत काम करीत आहेत.
त्रिखा यांची चौथी पिढी या रामलीलेत सक्रिय झाली आहे. वयाच्या ७७ व्या वर्षीही ते कलाकारांना प्रशिक्षण देऊन रामलीलेत प्रत्येक पात्राच्या भूमिकेचा सराव करून घेतात. गेल्या ४५ वर्षांपासून लक्ष्मणाचा एक रोल, एकच मैदान असणाऱ्या त्रिखा यांची गिनीज बुकात नोंद होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
"रामलीलेत मी लहानपणापासून सक्रिय आहे. माझी तिसरी पिढी काम करते आहे. अनेक वर्षांपासून हा उत्सव पूर्वजांनी सुरू केला आहे. तो आम्ही यशस्वीपणे चालू ठेवला यातच मोठा आनंद आहे. ४५ वर्ष लक्ष्मणाची भूमिका करायला मिळाली याचेच मी भाग्य समजतो. गेल्या अकरा वर्षांपासून कैकैची भूमिका करीत आहे."
- दिलबायगराय त्रिखा (ज्येष्ठ कलावंत गांधीनगर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.