Nashik News: शाळेची वेळ बदलणे हा अंतिम पर्याय नव्हे! पालक- जाणकारांची मतमतांतरे

School Statring News
School Statring Newsesakal
Updated on

Nashik News : ‘मुलं कोणत्याही वयोगटातील असो, त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. ती अपूर्ण राहिल्यास मुलं चिडचीड करतात, कोणत्याही गोष्टीत त्यांचे मन रमत नाही. अभ्यासातही त्यांचे लक्ष लागणार नाही, म्हणून सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळेत बदल करण्यास हरकत नाही; पण तत्पूर्वी मुलांचा स्क्रीनटाइम का वाढतो, आपणही त्यास जबाबदार आहोत का, याचाही विचार पालकांनी करायला हवा, असे सूतोवाच पालक, शिक्षक यांच्यासह समुपदेशकांनी व्यक्त केले आहे.

मुलांची झोप पूर्ण होणे आवश्यक असून, त्यादृष्टीने सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचा विचार व्हावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी नुकतीच मांडली. याविषयी शिक्षण क्षेत्रासह पालकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत आहेत. शाळांची वेळ उशिराने करणे हा पर्याय असू शकत नाही. याबाबत ‘सकाळ’ने पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांचे प्रमुख, समुपदेशकांची मते जाणून घेतली. (Parents and experts Opinion about changing school timing issue nashik news)

एकीकडे चांगल्या सवयी, शिस्त लागावी यासाठी मुलांना सकाळी लवकर उठविणे गरजेचे आहे. म्हणून सकाळी शाळा असायला हवी, असे काहींचे म्हणणे आहे; तर मुलांची झोप पूर्ण होणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे, तरच त्यांना ऊर्जा मिळेल आणि अभ्यासात लक्ष लागेल, असे काहींनी सुचविले.

बदलत्या जीवनशैलीनुसार पालक रात्री उशिरापर्यंत जागे असल्याने मुलंही रात्री उशिरा झोपतात. त्यांची झोप पुरेशी होत नाही. खऱ्या अर्थाने मेंदूचे कार्य हे माणूस झोपल्यावरच सुरू होते, असे समुपदेशक सांगत आहेत. मुळात दहावीपर्यंतच्या मुलांना मोबाईल देणे गरजेचे आहे का, याचा विचार पालक आणि समाजधुरिणांनी केला पाहिजे, असेही मत मांडण्यात आले.

पालकांची भूमिका

"शाळांच्या वेळा बदलण्याची भूमिका योग्य वाटते. बहुतांश शाळांची वेळ सकाळी सातची असल्याने साहजिकच विद्यार्थ्यांना लवकरच उठावे लागते. आजकाल विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्तही अभ्यास, संगणक, नृत्य, संगीत, गायन, खेळ आदींचे क्लास लावले जातात, त्यामुळे दिवसभरात आरामासाठी वेळ मिळतो कुठे? हा सर्व विचार करता रात्रीची झोप पुरेशी मिळणे गरजेचे आहे." - मकरंद तक्ते, येवला

''शाळेव्यतिरिक्त मुलांना अनेक ‘ॲक्टिव्हिटी’ असतात. रात्री झोपायला उशीर होत असल्याने सकाळी लवकर उठल्याने बहुतांश वेळा त्यांची झोप पूर्ण होत नाही. किमान हिवाळ्यात शाळा उशिराने भरल्या तर मुले आणि पालक दोघांना दिलासा मिळेल.'' - मनीषा गावडे, नाशिक

School Statring News
Nashik: वावी येथील ट्रामा केअर सेंटरचा प्रश्न मार्गी लागणार; आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीला यश

''ग्रामीण भागात मुले रात्री आठ ते नऊच्या दरम्यानच झोपत असल्याने ही समस्या गंभीर नाही. शहरी भागात मात्र पालकांची बदलती जीवनशैली, रात्रीचे उशिरा झोपणे किंवा सकाळी लवकर उठून ड्यूटीवर जाणे, मुलांचा वाढलेला ‘स्क्रीन टाइम’, सकाळी सातची शाळेची वेळ, त्यासाठी तासभर अगोदर बसमध्ये बसणे आणि दिवसभरात विद्यार्थ्यांची अभ्यास व अभ्यासपूर्वक घटकांसाठीची धावपळ पाहता वेळेबाबत निर्णय घेणे योग्य वाटते.'' - उमाकांत आहेर, येवला

''ग्रामीण भागात अनेक मुले, मुली आठ ते दहा किलोमीटरचा प्रवास करून शिक्षण घेतात. शाळांची वेळ पावणेसातची असल्याने पहाटे पाचपासून त्यांचा शैक्षणिक दिनक्रम सुरू होतो. शाळेचा अभ्यास, प्रवास, अन्यथा पायपीट, घरकाम आदी कामांमुळे विद्यार्थी थकतात. त्यांची पुरेशी झोप होत नसल्याने आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शाळांची वेळ आठच्या आत असूच नये.'' - अनिल सावंत, नामपूर

''मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने अनेक मुले रात्री उशिरापर्यंत मोबाईल वा संगणकावर असतात किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहतात. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळा सकाळी सातच्या आसपास भरतात. त्यासाठी मुलांना पहाटे साडेपाच वा सकाळी सहापासून, तर पालकांना जेवणाचा डबा आणि मुलांची तयारी करण्यासाठी पहाटे पाचलाच उठावे लागते. या सर्वांत मुलांची झोप पूर्ण होत नाही, शिवाय पालकांनाही धावपळ करावी लागते.'' - अमोल मंजुळे, सटाणा

''झोप पूर्ण होत नसल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती असते. अनेक कारणांनी मुलांना झोपायला उशीर होतो. त्यामुळे शाळा थोड्या उशिरा भरल्या तर मुलांसाठी सोयीचे ठरेल. यासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य निर्णय घ्यावा.'' - दीपाली पाटील, नाशिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी

School Statring News
Success Story: मनमाडचा शुभम जगताप सैन्यदलात लेफ्टनंटपदी

''प्ले ग्रुप, नर्सरीच्या गोंडस नावाखाली बालकांवर आघात केला जातो. अभ्यासाच्या ओझ्यामुळे संस्कारक्षम असलेले बालमन कुस्करले जाते. लवकर शाळेमुळे मुलांमध्ये चिडचीड वाढत चालली आहे. त्यांची झोप पुरेशी झाली पाहिजे.'' - युवराज पवार, राज्य उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

''पालकांबरोबर दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहणे, संगणक वा मोबाईलसाठी मुलांचा अधिक वेळ जात असल्याने उशिरा झोपण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागते, परिणामी झोप होत नाही. बाल मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार करता प्रसन्नता व अभ्यासात मन लागण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे, त्यामुळे राज्यपाल महोदयांची ही भूमिका योग्य वाटते.'' - बाजीराव सोनवणे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ, नाशिक

''सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले असले, तरी शिक्षक व पालक म्हणून मी हा अनुभव घेतला आहे, की बऱ्याच ठिकाणी शाळेच्या बस वेळेच्या तासभर किंवा दीड तास आधी येतात. त्यामुळे साडेसातच्या शाळेसाठी मुले पहाटे पाचला उठतात अन सकाळी सहा-साडेसहाला बसमध्ये चढतात. थंडीच्या दिवसांत तर अवघड होते. अनेकदा मुले बसमध्येच झोपी जातात अन डोळे चोळत वर्गात जातात. साधारणपणे पाचवीनंतर शाळेची वेळ सकाळची राहिली तर हरकत नाही; पण अंगणवाडी, नर्सरी, ज्युनिअर/सीनिअर केजी ते चौथीपर्यंत शाळेची वेळ सकाळी नऊनंतरची हवी.'' - विलास बांगर, राज्य उपाध्यक्ष, शिक्षक सहकार संघटना

''जिल्हा परिषदेची सध्याची शाळेची वेळ नऊनंतरच असल्याने अगदी योग्य असून, अध्यापन व विद्यार्थी आरोग्य यावर कोणताच परिणाम जाणवत नाही. मात्र, खासगी शाळा व इंग्लिश मीडियमबाबत हा प्रश्न जाणवत असून, सकाळी सातला भरणाऱ्या शाळांच्या वेळेबाबत मात्र अभ्यासपूर्वक निर्णय व्हायला हवा.'' - चंद्रकांत जानकर, सरचिटणीस, शिक्षक समिती, येवला

School Statring News
Nashik News: विकासाला गती, गुन्हेगारीला बसेल वचक; मालेगावच्या पोलिस आयुक्तालयाने गुन्हेगारीवर नियंत्रण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.