अमरावती- विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर १५०० रुपये परत घेऊ असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी या वक्तव्यावरून रवी राणा आणि महायुतीवर टीका करण्यास सुरुवात केली होती. आता रवी राणा यांनी यावर प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या जिल्ह्यातील कोणत्याही महिलेने म्हणावं की मी ते वक्तव्य गंभीरतेने बोललो आहे. गंमत म्हणून मी ते वक्तव्य केलं होतं. भाऊ आणि बहिणींच्या नात्यामध्ये असं थट्टा-मस्करी होत असते. कुणाला वाईट वाटेल असं ते वक्तव्य नव्हतं. भाऊ नेहमी बहिणीला मदत करत असतो. तिच्याकडून काही घेत नाही, असं म्हणत रवी राणा यांनी सारवासारव केली आहे.