बुलडाणा : शहर सौंदर्यीकरण व जवळपास सर्वच जाती-धर्मांच्या महापुरुषांचे स्मारकांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येत्या १९ सप्टेंबरला बुलडाणा दौऱ्यावर येत आहेत. महापुरुषांच्या स्मारकांच्या लोकार्पणासोबतच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या महिलांचा महामेळावा देखील आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.