नागपूर - ‘विधानसभा निवडणुकीत यंदा सहाव्यांदा दक्षिण-पश्चिम नागपूरची जनता मला आशीर्वाद देणार आहे. आज मी विरोधकांबाबत जास्त बोलणार नाही. पण ज्या लाडक्या बहिणीच्या तोंडचा घास पळवण्याकरिता माजी मंत्री सुनील केदार, नाना पटोलेंसारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी नागपूरच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांना लाडक्या बहिणीच पुरून उरतील,’ असा टोला उपमुख्यमंत्री व भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.