राज्य सरकारने शेतकऱ्यांना सोयाबीनला प्रति क्विंटल ८५०० रुपये भाव द्यावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागण्यांसाठी औसा (जि. लातूर) येथे शेतकरी नेते, अ.भा.छावा प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांची प्रकृती विचारली. काल रात्री मंत्री संजय बनसोडे यांना या उपोषणाची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, ज्याची दखल घेत बनसोडे यांनी लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर, मनोज जरांगे यांनीही विजयकुमार घाडगे यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.