मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. बुधवारी ते सोलापूरमध्ये होते. सोलापूरमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांची जाहीर सभा संपन्न झाली.
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, त्यासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. सरकार आपलं ऐकत नसेल तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारला धडा शिकवण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलं. जरांगे यांच्या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. यावेळी मनोज जरांगेंनी पुन्हा छगन भुजबळ यांच्यावर टीकास्र सोडलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.