Vinesh Phogat: विनेश फोगाट अपात्र होताच राहुल गांधी बोलायला उभे राहिले अन् लोकसभेत गोंधळ उडाला; काय घडलं नेमकं

Rahul Gandhi about vinesh phogat : संसदेचं अधिवेशन सुरु आहे. ऑलिंपिक स्पर्धेच्या ५० वजनी कुस्तीत भारतासाठी पदक निश्चित करणारी विनेश फोगाटला मोठा धक्का बसला आहे.

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये ५० वजनी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधीच भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ही अपात्र ठरली भारतासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान विनेश फोगाट च्या अपात्रते मागे षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

दिल्लीमध्ये संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. जेव्हा विनेशच्या अपात्रतेची बातमी आली त्याचवेळी संसदेत राहुल गांधींना वायनाडवर बोलण्यासाठी संधी मिळाली. त्याचवेळी विरोधकांनी विनेशच्या अपात्रतेवरुन लोकसभेत गोंधळ घातला. खेल मंत्री जवाब दो अशा घोषणा संसदेत देण्यात आल्या. मात्र लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना फक्त वायनाडवर बोलण्याचं आवाहन केलं. मग राहुल गांधी यांनी विनेशच्या अपात्रतेबद्दल न बोलता वायनाड दुर्घटनेचे प्रश्न मांडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.