Fact Check: आधार कार्डद्वारे 2% व्याजदराने खरंच कर्ज मिळते का? जाणून घ्या सत्य

Loan On Aadhar Card: या मेसेजमध्ये पुढे असाही दावा करण्यात आला आहे की, या योजनेद्वारे घेतलेले ५० टक्के कर्ज पुढे माफही केले जाणार आहे.
Fact Check|PIB|Loan On Aadhar Card
Fact Check|PIB|Loan On Aadhar CardEsakal
Updated on

Does we really get loan on Aadhaar card at 2% interest rate? Know the truth:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर असे अनेक मेसेज, पोस्ट तसेच व्हिडिओज व्हायरल होत असतात, ज्यामध्ये इंटरनेट यूजर्सना लुबाडण्याच्या उद्देशाने विविध सरकारी योजनांबाबत खोटे दावे केले जातात. यातून यूजर्सची वैय्यक्तिक किंवा बँकिंग संबंधी माहिती घेऊन त्यांची सायबर फसवणूक केली जाते.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर असाच एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधान योजनेंतर्गत आधार कार्डद्वारे वार्षिक 2 टक्के व्याजदराने कर्ज मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

असे असले तरी, या मेसेजबाबत केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोद्वारे चालवल्या जाणाऱ्या फॅक्ट चेक विभागाने सत्यता मांडली आहे. (Fact Check)

व्हायरल मेसेजमधील दावा

अनेक मोबाइल यूजर्सना गेल्या काही दिवसांपासून एक बनावट मेसेज येत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, पंतप्रधान योजनेअंतर्गत फक्त आधार कार्डवर 2 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज दिले जात आहे.

या मेसेजमध्ये पुढे असाही दावा करण्यात आला आहे की, या योजनेद्वारे घेतलेले ५० टक्के कर्ज पुढे माफही केले जाणार आहे.

Fact Check|PIB|Loan On Aadhar Card
Shiv Jayanti Fact Check: इंग्रज इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे शिवरायांना अक्षरज्ञान नव्हते? खरे पुरावे जाणून घ्या

सत्यता

या व्हायरल मेसेजमधील दाव्याबाबतची खरी माहिती मोबाइल यूजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी, केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने त्याची सत्यता तपासली.

'पीआयबी'च्या फॅक्टचेक युनिटने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर (ट्विटर) सांगितले, संबंधीत मेसेजमध्ये पंतप्रधान योजनेद्वारे आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याचा दावा खोटा आहे.

यासोबतच फॅक्टचेक युनिटने मोबाइल यूजर्सना असे फेक मेसेज शेअर न करण्याचे आवाहनही केले आहे.

या खोट्या मेसेजद्वारे सायबर फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याचाही प्रयत्न करू शकतात, असा इशारा पीआयबीने दिला आहे.

Fact Check|PIB|Loan On Aadhar Card
Shah Rukh Khan on Qatar : शाहरुख खानमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? भाजप नेत्याचा दावा! जाणून घ्या सत्य

फॅक्ट चेक कशी करायची?

जर तुम्हालाही सोशल मीडियावरील एखाद्या मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओबाबत शंका येत असेल, तर तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी PIB कडून त्याबाबतची सत्य परिस्थिती तपासू शकता.

यासाठी तुम्हाला PIB च्या अधिकृत वेबसाइट https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

याशिवाय, तुम्ही WhatsApp क्रमांक +918799711259 किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेसेज किंवा व्हिडिओ पाठवून फॅक्ट चेक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.