Exit Polls पुन्हा फेलं! हरियानातील पराभवाला काँग्रेसच जबाबदार, जय-पराजयाचं गणित कुठं फिस्कटलं?

Haryana Assembly Election Result 2024: हरियानामध्ये एक्झिट पोल पुन्हा फेलं ठरलं आहे. हरियाना विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला आहे. जाणून घ्या कारणं...
Reason for Congress defeat
Reason for Congress defeatESakal
Updated on

Haryana Assembly Election Result 2024: हरियाना विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल अतिशय धक्कादायक आहेत. एक्झिट पोलच्या निकालांवरून निवडणुकीत कॉंग्रेस बाजी मारेल असं सर्वांनाच वाटलं होतं. मात्र यावेळीही एक्झिट पोलनं कॉंग्रेसच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे. याआधी लोकसभा निवडणुकीचे निकालही हेच संकेत देत होते. याकाळात कॉंग्रेसमध्ये मोठा आत्मविश्वास पाहायला मिळाला आणि हेच कारण ठरलं कॉंग्रेसच्या पराभवाचे...

जर निवडणुका आणि मोदी लाटेबाबत बोलायचे झाले तर, हरियानामध्ये पंतप्रधानांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 10, 2019 मध्ये 6 आणि 2024 मध्ये फक्त 4 सभा घेतल्या आहेत. यासोबतच सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले मनोहर लाल खट्टर यांनाही हटवून निवडणुकीपूर्वीच नायबसिंग सैनी यांना खुर्चीवर बसवण्यात आले. मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात पक्षात असंतोष वाढत होता. त्याचवेळी महिला कुस्तीपटूंचा प्रश्न, जाटांचा रोष, जुन्या पेन्शनची मागणी, अग्निवीर योजनेबाबत असंतोष, पेपरफुटी असे अनेक मुद्दे भाजपविरोधात वातावरण निर्माण करण्यास पुरेसे होते.

Reason for Congress defeat
Haryana Assembly Election 2024: हरियानात भाजपनं तिसऱ्यांदा रोवला झेंडा! 'या' व्यक्तीमुळं साधली दमदार हॅटट्रिक

जोरदार घोषणाबाजी करण्यात माहीर असलेल्या भाजपला हरियाना विधानसभा निवडणुकीत '400 पार' सारखा नाराही देता आला नाही. एकंदरीतच हरियानामध्ये पुन्हा मोदी लाट किंवा भाजपची सुनामी येणार नाही हे स्पष्ट दिसत होते. मात्र तरीही भाजपने बाजी मारली आणि पुन्हा कॉंग्रेस तोंडावर आपटले. मात्र असं का घडलं हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर दुसरीकडे हरियानातील पराभवाला कॉंग्रेसच जबाबदार असल्याची काही कारणं समोर आली आहेत. नेमंक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं घोडं नक्की कुठं अडलं?

काँग्रेसमध्ये गटबाजी...

काँग्रेस नेत्यांना विश्वास होता की, हरियानात पक्ष सरकार स्थापन करणार आहे आणि राज्यातील चार मोठे नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सामील झाले आहेत. भूपेंद्र हुडा, कुमारी सेलजा, रणदीप सुरजेवाला आणि किरण चौधरी यांच्यात चढाओढ सुरू होती. मात्र काही कारणांमुळे किरण चौधरी यांनी पक्ष सोडला. त्यामुळे त्यांची मुलगी श्रुती चौधरी या काँग्रेसच्या चार कार्याध्यक्षांपैकी एक होती. त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले. गेल्या 10 वर्षात भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या सत्ताविरोधी रागाचे भांडवल करण्याऐवजी ते विखुरले गेले.

दहा वर्षांत संघटना करण्यात काँग्रेसला अपयश

हरियाणात काँग्रेस दहा वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. या काळात कुमारी सेलजा या पक्षाच्या अध्यक्षाही होत्या. मात्र त्यांच्या कार्यकाळात पक्ष संघटना तळागाळात मजबूत होऊ शकली नाही. यानंतर हुड्डा यांच्या गटातील मानल्या जाणाऱ्या उदयभान यांच्या हाती कमान देण्यात आली. मात्र या काळातही संस्थेचे कोणतेही काम होत नाही. स्थानिक पातळीवर जिल्हाप्रमुख आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना तयार करण्याचे काम झाले नाही. तर या काळात 4 कार्याध्यक्ष निश्चितच करण्यात आले.

Reason for Congress defeat
Haryana Election Result 2024: हरियानाची राजकीय खेळपट्टी ज्यावर वीरेंद्र सेहवागने केली होती 'फलंदाजी', आता कोण करतंय स्कोर?

तिकीट वाटपातही संघर्ष

तिकीट वाटपातही भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याच शब्दांचा जास्त विचार करण्यात आला. अनिल विज ज्या अंबाला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तेथे अपक्ष चित्रा सरवर दीर्घकाळ आघाडीवर होत्या. त्या काँग्रेसमध्ये होत्या पण पक्षाने त्यांना बाजूला केले होते. तसेच हुड्डा यांच्या रॅलीत सेलजा यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या गेल्या, ज्याचे भाजपने भांडवल करून त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रणही दिले. सेलजा आणि हुड्डा प्रकरण सोडवण्यात काँग्रेस हायकमांडने दिरंगाई केल्याने दलित मतदार विखुरला गेला. याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसला.

प्रचारातही काँग्रेस कमी पडलं

काँग्रेसचा निवडणूक प्रचार खूपच खराब झाला आहे. निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच भाजपने जनसंपर्क सुरू केला होता आणि पीएम मोदींनी दोनदा हरियानाचा दौरा केला होता. त्यासोबतच मनोहर लाल खट्टर यांच्याबद्दल असंतोष निर्माण झाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आलं होतं. नायबसिंग सैनी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. यासोबतच काँग्रेसच्या काही उमेदवारांनी गैर-जाट मतदारांच्या विरोधात वक्तव्ये केली. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे निवडणूक प्रचारासाठी हरियानात आले नाही.

निवडणुकीत पैशांचा वापर

2014 पासून आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हरियाणामध्ये 90 पैकी 47 जागा जिंकून पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले होते. यानंतर 2019 मध्ये भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या पक्ष जेजेपीसोबत सरकार स्थापन केले तेव्हा भाजपला केवळ 40 जागा जिंकता आल्या. जेजेपीला 10 जागा मिळाल्या. यासोबतच आणखी एक वस्तुस्थिती स्पष्टपणे दिसून येते की गुजरातप्रमाणे हरियाणामध्येही भाजपने मूक व्होट बँक तयार केली आहे जी कोणताही आवाज न करता शांतपणे पक्षाच्या बाजूने मते टाकेल. तर दुसरी गोष्ट म्हणजे भाजप निवडणुकीत पैशांचा वापर जास्त करतं अशी चर्चा आहे. तर कॉंग्रेस कमी पैसे खर्च करते. यामुळे त्यांना काही जागा जिंकण्यात अपयश येतं असंही बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.