Haryana Assembly elections Congress Vinesh Phogat - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची बरीच चर्चा झाली. ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होती. पण, अंतिम सामन्यापूर्वी १०० ग्रॅम वजन जास्तीचं भरलं आणि तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली. या निर्णयाने निराश झालेल्या विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. ती पुढे काय करणार, याचे उत्तर थोड्याच दिवसांनी मिळालं आणि तिने काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणाच्या आखाड्यात उडी मारली.
काँग्रेसने तिला हरयाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तिच्यासमोर भाजपाच्या कॅप्टन योगेश बैरागी आणि आपच्या कविता दलाल यांचे आव्हान आहे. दरम्यान, विनेशने तिचा उमेदवारी अर्ज भरला आणि त्यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिने संपत्ती जाहीर केली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीत विनेशने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तिचे एकूण वार्षिक उत्पन्न १३ लाख ८५,१५२ रुपये असल्याचे म्हटले आहे. तिच्या पती सोमवीर राठीचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ४४,२२० रुपये आहे. बक्षीस रक्कम, रेल्वेत नोकरी आणि अनेक कंपन्यांचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्यांनी ही संपत्ती कमावली आहे.
वेगवेगळ्या बँकांमध्ये सुमारे ४० लाख रुपये जमा असल्याचे काँग्रेस उमेदवाराने सांगितले आहे. याशिवाय दीड लाखाचा प्रीमियम विमा, १.१० कोटींची जंगम आणि १.८५ कोटींची स्थावर मालमत्ता तिच्याकडे आहे. तिच्या पतीकडे एकूण ५७.३५ लाखांची जंगम मालमत्ता आहे. कुटुंबाकडे एकूण २.१० लाख रुपये रोख आहेत. सोमवीरच्या दोन बँक खात्यांपैकी एका खात्यात ४८ हजार रुपयांची मुदत ठेव आहे.
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार विनेशकडे चार कार आहेत आणि पती सोमवीरकडे एक आलिशान कार आहे. या आलिशान वाहनांची एकूण किंमत १.२३ कोटी आहे. विनेशकडे Volvo XC 60, Hyundai Creta, Toyota Innova आणि TVS Jupiter बाईक आहेत. सोमवीरच्या नावावर महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आहे.
- ३ गाड्या, १.९५ लाख रोख रक्कम
- सोनिपत येथे २ कोटी किंमतीचे प्लॉट
- इनोव्हा कारसाठी घेतलेल्या १३ लाखांच्या कर्जाची परतफेड
- दीड लाखाचा प्रीमियम विमा, १.१० कोटींची जंगम आणि १.८५ कोटींची स्थावर मालमत्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.