Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: अर्ध्या तासात पलटली बाजी; हरियानात भाजप पुढे

Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE Vidhan Sabha Nivadnuk Nikal: जम्मू आणि काश्मिर व हरियानात आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024
Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024Esakal

BJP Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: अर्ध्या तासात पलटली बाजी; हरियानात भाजप पुढे

मतमोजणी सुरू झाल्यापासून आघाडीवर असलेली काँग्रेस हरियानात आता मागे पडली असून भाजपने 30 जागांवर आघाडी मिळवली आहे तर काँग्रेस 28 जागांवर घसरली आहे.

Congress Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: काँग्रेस मारणार बाजी? दोन्ही राज्यात गाठली मॅजिक फिगर

हरियाना आणि जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात काँग्रेसने बहुमतासाठी लागणाऱ्या 46 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे.

Jammu Kashmir Assembly Election Result 2024 Live: जम्मू काश्मिरमधील सर्व 90 जागांचे कल हाती, जाणून घ्या कुणी मारली मुसंडी

जम्मू आणि काश्मीरमधील सर्व 90 जागांचे ट्रेंड आले आहेत, काँग्रेस +44 वर, भाजप 34 आणि इतर 12 जागांवर आघाडीवर आहे.

Vinesh Phogat Haryana Assembly Election Result 2024 LIVE: ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर? जाणून घ्या हरियाना विधानसभेचा निकाल

ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटने काँग्रेसकडून हरियाना विधानसभा निवडणूक लढवली होती. आज सुरू झालेल्या मतमोजणीत जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाटने आघाडी घेतली आहे.

Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: भाजपला कलम 370 हटवण्याचा फायदा होणार का? जम्मू काश्मिरमध्ये कोण आघाडीवर?

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक पार पडली आहे. त्याची मतमोजणी आज सुरू झाली असून, आतापर्यंत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरंन्स आघाडीने 24 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे.

Haryana Assembly Election Result Live: पहिल्या अर्ध्या तासातच काँग्रेसने गाठली मॅजिक फिगर

हरियाना विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेसने बहुमतासाठी लागणाऱ्या 46 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे.

Haryana Assembly Election Result 2024 LIVE: हरियानात काँग्रेस सुसाट, आतापर्यंत मिळवली 'इतक्या' जागांवर आघाडी

हरियानामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरूवात झाली असून यामध्ये काँग्रेसने मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 22 जागांवर अघाडीवर आहे.

Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: हरियाना, जम्मू काश्मिरमध्ये मतमोजणी सुरू

हरियाना आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. हरियानातील सर्व 22 जिल्ह्यांतील 90 विधानसभा जागांवर आणि जम्मू-काश्मीरमधील सर्व 20 जिल्ह्यांतील 90 जागांवर उमेदवारांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे.

Haryana Assembly Election Result 2024 LIVE: एक्झिट पोल म्हणताहेत काँग्रेस, तर मुख्यमंत्री म्हणताहेत भाजप येणार

हरियानाचे मुख्यमंत्री आणि लाडवा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नायबसिंग सैनी म्हणाले, "भाजपने गेल्या दहा वर्षांत हरियानाच्या विकासासाठी खूप काम केले आहे. भाजपने समाजातील सर्व घटकांसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे हरियानात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल.

Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: हरियानात भाजपचे वर्चस्व राहणार की सत्तेला राम-राम करणार? जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगी लढत; आज निर्णय

90 जागांच्या हरियानामध्ये 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पूर्ण झाले आणि अंदाजे 65 टक्के मतदान झाले. त्याच वेळी, 90 जागा असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. येथे एकूण 63.88 टक्के मतदान झाले.

Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: पोस्टल मतांची मोजणी आधी प्रथम

हरियानात बादशाहपूर, गुरुग्राम आणि पतौडी विधानसभा जागांसाठी प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्रे, तर उर्वरित ८७ मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ९० मतमोजणी निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पोस्टल मतपत्रिकांची प्रथम मोजणी केली जाईल, त्यानंतर 30 मिनिटांनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) मतांची मोजणी केली जाईल.

Jammu And Kashmir Election Result Live: विजयासाठी उमेदवारांचे होम-हवन

जम्मू आणि काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी राज्यातील अनेक बडे नेते पूजेत मग्न आहेत. भाजपचे रवींद्र रैना पहाटेपासून वियासाठी हवन-यज्ञ करत आहेत.

Haryana Assembly Election Result 2024 LIVE: हरियानातील 1031 उमेदवारांचे भवितव्याचा फैसला

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील २.०३ कोटी मतदारांनी ५ ऑक्टोबर रोजी मतदान केले होते. 1031 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील झाले असून, आज त्याचे निकाल येणार आहेत.

Haryana Assembly Election Result 2024 LIVE: नवीन सरकार कोणाचे येणार? हरियानातील उत्सुकता वाढली

हरियानातील ९० जागांवर मतदान संपल्यानंतर राज्यात नवीन सरकार कोणाचे येणार हे समजण्यासाठी आता उलटी गिनती सुरू झाली आहे. बहुतांश एक्झिट पोलने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. हरियाणात दहा वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह असतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीबाबतही चुरस सुरू झाली आहे.

Haryana And Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: जम्मू-काश्मीर आणि हरियानामधील ९० विधानसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे. २०१४ नंतर जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत पार पडल्या आणि त्यात ६३.४५ टक्के मतदान झाले, जे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नोंदवलेल्या ६५.५२ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.