Kangana Ranuat: ऑलिम्पिकच्या वादात कंगना रणौतची उडी; पुरुषाची मॅच महिलेशी लावल्याने भडकली अभिनेत्री

Paris Olympic Controversy: ऑलिम्पिकच्या महिला बॉक्सिंग राउंडमध्ये एक मोठा वाद समोर आला आहे. एका पुरुषाने महिला बॉक्सरसोबत मॅच खेळल्याचं समजतं आहे.
kangna ranaut
kangna ranaut esakal
Updated on

Paris Olympic Boxing Controversy: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती नेहमीच तिची मतं बिनधास्तपणे मांडताना दिसते. राजकारण असो किंवा अभिनय ती टीका करताना मागे पुढे पाहत नाही. सध्या ऑलिम्पिक २०१४ची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र बॉक्सिंग रिंगमध्ये घडलेल्या एका गोष्टीमुळे वादाला तोंड फुटलं आहे. एका पुरुष बॉक्सरची महिलेशी लढत लावल्याचा प्रकार समोर आला आहे. कंगनाने देखील त्यावर भाष्य केलंय. तिने या प्रकरणी संताप व्यक्त करत एक स्टोरी शेअर केली आहे.

काय म्हणाली कंगना?

कंगना रणौतने अँजेला कॅरिनीचा फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिले की, 'या मुलीला अशा व्यक्तीशी लढावे लागले ज्याची उंची 7 फूट आहे, जो पुरुष म्हणून जन्माला आला आहे, ज्याचे शरीराचे अवयव पुरुषासारखे आहेत, जो पुरुषासारखा दिसतो. तो पुरुषासारखा आहे आणि तो बॉक्सिंग रिंगमध्ये पुरुषासारखा लढतो. पण, ती मुलगी असल्याचं सांगितलं गेलं. आता तुम्हीच अंदाज लावा हा बॉक्सिंग सामना कोणी जिंकला? तुमच्या मुलीची नोकरी किंवा पदक कोणी हिसकावून घेण्यापूर्वी त्याविरोधात आवाज उठवा.'

kangna ranaut
kangna ranaut esakal

नेमकं प्रकरण काय आहे?

हा सामना अल्जेरियन बॉक्सर इमान खेलिफ आणि इटलीच्या अँजेला कॅरिनी यांच्यामध्ये झाला होता. इमानने अँजेला कॅरिनीचा ४६ सेकंदात पराभव केला. खेलिफने जोरात पंच मारल्याने कॅरिनीच्या नाकाला जबर मार बसला आणि ती प्राथमिक उपचार घेण्यासाठी तिच्या प्रशिक्षकाकडे गेली. तिने तिचे हेडगिअर सरळ केले आणि पुन्हा लढण्यासाठी आली, परंतु ती पुन्हा कॉर्नरवर परतली आणि बॉक्सिंग रिंग बाहेर पडली. त्यामुळे इमान जिंकली मात्र इमान हा पुरुष असल्याचं सांगण्यात येतंय. इमान हा पुरुष होता आणि त्याने स्त्री होण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतली. मात्र असं असलं तरी त्याचे शारीरिक गुणधर्म बदलत नाहीत. त्याचं इतर शरीर आणि ताकद पुरुषापइतकीच आहे. त्यामुळे एका पुरुष खेळाडूशी कॅरिनीची लढत लावण्यात आल्याने आता सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त केली जातेय.

kangna ranaut
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी शेअर केला शाळेतला तब्बल ७० वर्षांपूर्वीचा फोटो, तुम्ही बिग बींना ओळखलंत का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()