जेठालालला भेटायला आला त्याचा सगळ्यात मोठा फॅन, ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकल्याबद्दल मिळालं सर्वात बेस्ट गिफ्ट

Aman Sehravat Meet Jethalal: ऑलिम्पिक २०२४ मध्ये अमन सेहरावत याने कांस्यपदक मिळवलं. त्यानंतर त्याने त्याच्या आवडत्या अभिनेत्याची भेट घेतली.
dilip joshi and aman sehravat
dilip joshi and aman sehravat esakal
Updated on

यावर्षीचा ऑलिम्पिक सोहळा अनेक गोष्टींमुळे खास ठरला. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण सहा पदकं जिंकली. त्यात १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश होता. यावर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २१ वर्षीय अमन सेहरावत याने जबरदस्त कामगिरी करत कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवलं. आता या सोहळ्यानंतर अमन पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने शेअर केलेले फोटो. अमनने नुकतीच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांची भेट घेतली. या भेटीत दिलीप यांनी अमनला एक खास गोष्ट देखील भेट म्हणून दिली आहे.

aman sehravat dilip joshi
aman sehravat dilip joshi esakal

अमनदेखील तारक मेहता या कार्यक्रमाचा मोठा चाहता आहे. तो दिलीप जोशी यांचा फॅन आहे. त्याने ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर दिलीप यांची खास भेट घेतली. या भेटीत कुस्तीपटूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिलीप यांनी त्याला थेट जेठालालचा आवडता नाश्ता दिला. दिलीप यांनी अमनला जलेबी आणि फाफडा नाश्ता म्हणून दिल्या. अमनने त्यांचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यात तो त्याच्या लाडक्या जेठालालसोबत बसलेला दिसतोय. तर आपल्या लाडक्या अभिनेत्याला भेटण्याचा आनंद अमनच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय.

तर दिलीप यांनाही अमनला भेटून आनंद झाला आहे. त्यांनीही एक पोस्ट शेअर करत त्याचं त्याच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे. अमनने पोस्ट करत लिहिलं, 'आज मला जेठालाल - दिलीप जोशी यांना भेटून खूप बरं वाटलं. यांना पाहून तारक मेहतामध्ये नेहमीच मला आनंद भेटला आहे. खूप खूप धन्यवाद.' त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. आपण आराम करत असताना एकमेव कार्यक्रम पाहायचो तो म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा' असंही अमन म्हणाला.

dilip joshi and aman sehravat
Bigg Boss Marathi 5: सब गोलमाल है! जान्हवीने पॅडीची मागितलेली माफी स्क्रिप्टेड? बाहेरील परिस्थितीमुळे बिग बॉसने स्वतः दिले आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.